कांदिवलीच्या तरुणाचा मृतदेह भाईंदर किनारी

By Admin | Updated: February 8, 2017 23:00 IST2017-02-08T23:00:24+5:302017-02-08T23:00:24+5:30

कांदिवलीच्या चारकोप भागात राहणा-या रविकुमार हरिप्रसाद पांडे (21) ह्या तरुणाचा मृतदेह भाईंदरच्या चौक समुद्र किना-याजवळ आढळून आला.

Kandivali youth's body Bhyandar border | कांदिवलीच्या तरुणाचा मृतदेह भाईंदर किनारी

कांदिवलीच्या तरुणाचा मृतदेह भाईंदर किनारी

ऑनलाइन लोकमत
मीरा रोड, दि. 8 - कांदिवलीच्या चारकोप भागात राहणा-या रविकुमार हरिप्रसाद पांडे (21) ह्या तरुणाचा मृतदेह भाईंदरच्या चौक समुद्र किना-याजवळ आढळून आला. त्याने आत्महत्या केल्याचा संशय असून, चारकोप पोलीस पुढील तपास करीत आहेत.

गणेशकृपा सोसायटीत राहणारा रविकुमार हा 4 फेब्रुवारी रोजी रात्री घरातून रागाच्या भरात निघून गेला होता. त्याच्या वडिलांनी दुस-या दिवशी चारकोप पोलीस ठाण्यात तो बेपत्ता झाल्याची तक्रार केली होती.

मंगळवारी सायंकाळी मच्छीमार विल्यम गोविंद यांना अनोळखी तरुणाचा मृतदेह निदर्शनास आल्यावर त्यांनी उत्तन सागरी पोलिसांना माहिती दिली. त्याच्या खिशात वडिलांचा भ्रमणध्वनी क्रमांक सापडल्याने त्याची ओळख पटली. 12वी नापास झाल्या नंतर तो खासगी कंपनीत काम करत होता. चारकोप पोलिसांशी संपर्क साधला असता त्यांनी माहिती देण्यास नकार दिला.

Web Title: Kandivali youth's body Bhyandar border