कन्नड बाजार समिती निवडणुकीत आ.जाधव गटाची मुसंडी!

By Admin | Updated: November 6, 2016 16:36 IST2016-11-06T16:36:24+5:302016-11-06T16:36:24+5:30

कन्नड बाजार समितीच्या निवडणुकीचा निकाल रविवारी जाहीर करण्यात आला. यात आ.हर्षवर्धन जाधव यांच्या सरसेनापती बाळासाहेब ठाकरे आघाडीने १८ पैकी ०९ जागा पटकावित जोरदार मुसंडी मारली.

Kandh Market Committee elections, Awadhav group thriller! | कन्नड बाजार समिती निवडणुकीत आ.जाधव गटाची मुसंडी!

कन्नड बाजार समिती निवडणुकीत आ.जाधव गटाची मुसंडी!

 ऑनलाइन लोकमत 

कन्नड, दि. 6 - कन्नड बाजार समितीच्या निवडणुकीचा निकाल रविवारी जाहीर करण्यात आला. यात आ.हर्षवर्धन जाधव यांच्या सरसेनापती बाळासाहेब ठाकरे आघाडीने १८ पैकी ०९ जागा पटकावित जोरदार मुसंडी मारली. तर काँग्रेस-सेना प्रणीत पॅनेलला ०७ व राष्ट्रवादीला एका जागेवर तर एका जागेवर अपक्ष उमेदवाराने विजय मिळवला.
           आ.जाधव यांनी वेगळी चुल मांडून बाजार समितीत पॅनेल उभे केले. शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांनी कांग्रेस सोबत जात युती केली. तर राष्ट्रवादी कांग्रेस व भाजपा युती झाली. कांग्रेस पक्षाचा नेहमीच दबदबा असलेल्या सोसायटी मतदार संघात आ.जाधव यांनी तीन जागा पटकावित मोठा हादरा दिला. तर ग्रामपंचायत मधील चार, व्यापारी मतदार संघात एक व हमाल मापाडी बिनविरोध अशा नऊ जागा ताब्यात घेतल्या.

विजयी उमेदवार

सहकारी संस्था मतदार संघ सर्वसाधारण- घुले प्रकाश पांडुरंग,पवार किशोर नारायणराव, मगर अशोक सर्जेराव, मनगटे कैलास साळुबा, मोहिते बाबासाहेब लक्ष्मणराव, राजपूत गोकुळसिंग तोताराम, वेताळ पंडितराव पुंजाबा
विमुक्त जाती भटक्या जमाती- बेडवाल धनराज शिवसिंग,

इतरमागास प्रवर्ग- जाधव भरत लक्ष्मणराव
ग्रामपंचायत सर्वसाधारण- जाधव बाळासाहेब राऊबा, बोरसे सोनाली जयेश.

अनुसूचित जाती जमाती प्रवर्ग- बनकर दिलीप दयानंद

आर्थिक दुर्बल घटक प्रवर्ग- मगर राजेंद्र काशिनाथ,

व्यापारी मतदार संघ- अग्रवाल प्रकाश पूनमचंद, गंगवाल महावीर शांतिलाल,

हमाल मापाडी मतदार संघ- शेख युसूफ शेख मुनीर,  

Web Title: Kandh Market Committee elections, Awadhav group thriller!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.