कामोठे पोलिस स्थानकामध्ये माथेफिरुने केली तोडफोड
By Admin | Updated: October 15, 2016 18:44 IST2016-10-15T18:32:30+5:302016-10-15T18:44:34+5:30
पनवेलजवळच्या कामोठे पोलिस स्टेशनमध्ये घुसून शनिवारी सकाळी एका अज्ञात माथेफिरुने तोडफोड केली.

कामोठे पोलिस स्थानकामध्ये माथेफिरुने केली तोडफोड
ऑनलाइन लोकमत
पनवेल, दि. १५ - पनवेलजवळच्या कामोठे पोलिस स्टेशनमध्ये घुसून शनिवारी सकाळी एका अज्ञात माथेफिरुने तोडफोड केली. त्याने पोलिस स्टेशनमधील खुर्च्या, टेबल व इतर सामान फोडले. या माथेफिरूने कामोठे पोलीस मधील ऑफिसर रूम मधील सामानाची नास धुस केली आहे.
या मध्ये पोलीस स्टेशन मधील कपाट, टेबल, काचेचे सामान फोडले आहे. मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. आनंद सरगर अशे माथे फिरू चे नाव आहे पोलिसांनी लगेच या माथेफिरूला ताब्यात घेतले. ही तोडफोड करण्यामागचे कारण समजू शकलेले नाही. या माथेफिरुला वैद्यकीय तपासणीसाठी मुंबईला पाठवण्यात आले आहे.