शहरं
Join us  
Trending Stories
1
“तुम्ही बोलत नाही, आम्ही ओबीसी आरक्षणासाठी लढायचे नाही का?”; छगन भुजबळांचा शरद पवारांना सवाल
2
Nanded: शांतता बैठकीतच मराठा-ओबीसी वादाला हिंसक वळण, रिसनगावात ४ जखमी
3
हैदराबाद गॅझेटवर हायकोर्टाचा मोठा निर्णय; याचिकाकर्त्यांना सुनावले, आता मराठा आरक्षणाचे काय?
4
“GST सुधारणा हा राहुल गांधींच्या दूरदृष्टीचा विजय, २२ तारखेला राज्यभर पेढे वाटणार”: काँग्रेस
5
'खोटारडं' पाकिस्तान पुन्हा उघडं पडलं... मॅच रेफरीच्या केबिनमध्ये काय घडलं? सत्य समोर आलं...
6
Kangana Ranaut : "माझ्याच हॉटेलचा काल ५० रुपयांचा धंदा", पूरग्रस्तांसमोर कंगना राणौतने मांडली स्वत:चाची व्यथा
7
अभिमानास्पद! वडील हवाई दलात अधिकारी, लेक झाली लेफ्टनंट; इंजिनिअरिंगनंतर देशसेवेचं स्वप्न
8
ठाकरे बंधू एकत्र आले तर मविआवर काय परिणाम होईल? शरद पवार थेट म्हणाले, “मग आता वेगळे...”
9
Video: उंटाने पहिल्यांदाच चाखली लिंबाची चव अन् 'अशी' झाली अवस्था, पाहून तुम्हालाही येईल हसू
10
Javelin Throw Final : भारताचा गोल्डन बॉय नीरज अन् पाक ऑलिम्पिक चॅम्पियन नदीमवर भारी पडला सचिन; पण...
11
यंदा रावण नाही, सोनम रघुवंशीचा पुतळा जाळणार! इंदूरच्या नागरिकांचा वेगळाच दसरा प्लॅन; राजाच्या कुटुंबालाही आमंत्रण
12
राहुल गांधींच्या हायड्रोजन बॉम्बपूर्वी चंद्रपूरच्या 'राजुरा' मतदारसंघात खळबळ ! निवडणूक आयोगावर मत वगळण्याचे गंभीर आरोप
13
घटस्फोटाचे प्रमाण कमी करण्यासाठी राज्यात दहा ठिकाणी सुरु होणार प्री-मॅरेज काउन्सिलिंग सेंटर
14
भगवान विष्णू यांच्यावरील वक्तव्यासंदर्भात CJI बीआर गवई यांचं स्पष्टिकरण; 'संयम राखायला हवा...', विश्वहिंदू परिषदेचा सल्ला
15
सात दिवस अविरत उपसले कष्ट, तेव्हा हाती लागली मौल्यवान रत्नं, मजूर महिलेचं नशीब उजळलं 
16
IND vs PAK हस्तांदोलन वादाचा खरा आरोपी सापडला... सामनाधिकारी पॉयक्रॉफ्टची चूकच नव्हती!
17
लग्न कधी करणार? श्रिया पिळगावकरला थेट प्रश्न; म्हणाली, "माझे आईबाबा सांगतात की..."
18
अंगणवाडी सेविकांना मिळणार स्मार्टफोन, वाढणार मानधन; योगी आदित्यनाथ यांची मोठी घोषणा
19
अभिनेता श्रेयस तळपदेवर गुन्हा दाखल; उत्तराखंडमधील घोटाळा प्रकरण, आलोक नाथ यांचेही नाव...
20
सुनेला वाचवण्यासाठी धावली सासू, पण तेवढ्यात धडाधड कोसळली भिंत, सून वाचली पण...  

लोकसभेला भाजपला बसला फटका! चंद्रशेखर बावनकुळेंच्या मतदारसंघात मविआचं गणित काय?

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 11, 2024 15:39 IST

Maharashtra Assembly Election 2024: लोकसभा निवडणुकीत भाजपला कामठी विधानसभा मतदारसंघात धक्का बसला होता. या मतदारसंघात महाविकास आघाडीला मताधिक्य मिळाले होते.  

जितेंद्र ढवळे, कामठी (नागपूर)Kamthi Vidhan Sabha Election 2024: दलित, मुस्लीम, कुणबी, तेली मतांवर भिस्त असलेल्या कामठी मतदारसंघात लोकसभेत महायुतीला १७ हजार ५३४ मतांचा फटका बसला. त्यामुळे विधानसभेत कामठीचे मैदान वाचविण्यासाठी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे स्वतः निवडणुकीच्या आखाड्यात उतरले आहेत.

बावनकुळेंना रोखण्यासाठी काँग्रेसने माजी जि. प. अध्यक्ष सुरेश भोयर यांना संधी देत परिवर्तनचा संकल्प केला आहे. मात्र, भोयर यांना याही वेळी भाजपपेक्षा स्वः पक्षीयांचेच आव्हान आहे. 

अवघ्या राज्याचे लक्ष लागलेल्या कामठीत २०१९ मध्ये भाजप नेतृत्वाने बावनकुळे यांना अखेरच्या क्षणी संधी नाकारली होती. मात्र, यावेळी पहिल्याच यादीत बावनकुळे यांचे नाव आल्याने भाजप कार्यकर्त्यांमध्ये डबल जोश दिसून येत आहे. 

विद्यमान आमदाराचे भाजपने कापले तिकीट

येथे भाजपने विद्यमान आमदार टेकचंद सावरकर यांचे तिकीट कापत बावनकुळे यांच्या संघटन कौशल्यावर विश्वास ठेवला आहे. २०१९ मध्ये भाजपच्या मजबूत संघटनेच्या बळावर सावरकर विधानसभेत पोहोचले होते. त्यामुळे लोकसभेत जरी महाविकास आघाडीला कामठीत लीड मिळाला असला, तरी विधानसभेत बावनकुळेंना रोखताना कॉग्रेसला घाम फुटणार आहे.

१९ उमेदवार रिंगणात असलेल्या कामठीत बसपाने विक्रांत सुरेंद्र मेश्राम, वंचित बहुजन आघाडीने प्रफुल्ल मानके, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाने (ए) अमोल वानखेडे, पीपल्स पार्टी ऑफ इंडियाने (डेमोक्रेटिक) जगदीश वाडीभस्मे, राष्ट्रीय समाज पक्षाने नफीस अब्दुल अलीम शेख, भीमसेनेने नितीन सहारे, जय विदर्भ पार्टीने प्रशांत नखाते, आजाद समाज पार्टीने (कांशीराम) प्रशांत बन्सोड, आंबेडकराईट पार्टी ऑफ इंडियाने विजय डोंगरे यांना संधी दिली आहे. याशिवाय ८ अपक्षांनीही दंड थोपाटले आहेत.

मुस्लीम मतांच्या विभाजनाचा भोयर यांना फटका?

कामठी शहर आणि नागपूर ग्रामीणमध्ये आघाडी घेणारा उमेदवारच कामठीचा आमदार ठरतो, हे वास्तव आहे. मात्र याही वेळी कामठीतून काँग्रेसशी संबंधित स्थानिक मुस्लीम नेत्यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करीत भोयर यांच्यापुढे आव्हान उभे केले आहे. 

यात काँग्रेस माजी नगराध्यक्ष शहाजहा शफाहत अंसारी (साजा सेठ) यांचे भाऊ अपक्ष उमेदवार फिरोज अहमद अंसारी, माजी नगरसेवक नविद अख्तर मो. रफिक नवीद, तर सुलेमान अब्बास चिराग अली हैदरी यांचा समावेश आहे. या तिघांसह फैय्याद अहमद अंसारी हेही अपक्ष निवडणूक लढवित आहेत.

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४vidarbha regionविदर्भ महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४kamthi-acकामठीChandrashekhar Bawankuleचंद्रशेखर बावनकुळेcongressकाँग्रेसBJPभाजपा