कामत, आलेमाव आणखी अडचणीत
By Admin | Updated: August 8, 2015 01:38 IST2015-08-08T01:38:59+5:302015-08-08T01:38:59+5:30
जैका लाच प्रकरणातील महत्त्वाचा दुवा आणि लाचेची रक्कम पुरविणारा दलाल, हवाला एजंट रायचंद सोनी याला गुन्हा अन्वेषण विभागाने शुक्रवारी अटक केली आहे

कामत, आलेमाव आणखी अडचणीत
पणजी : जैका लाच प्रकरणातील महत्त्वाचा दुवा आणि लाचेची रक्कम पुरविणारा दलाल, हवाला एजंट रायचंद सोनी याला गुन्हा अन्वेषण विभागाने शुक्रवारी अटक केली आहे. त्याने पणजी प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी न्यायालयात नोंदविलेल्या जबानीत दिगंबर कामत आणि चर्चिल आलेमाव यांना लाच दिल्याची कबुली दिल्यामुळे या दोघांच्या अडचणी वाढल्या आहेत.
लुईस बर्जर कंपनीकडून कामत आणि चर्चिल यांना मिळालेल्या कथित लाचेची रक्कम पुरविण्याचे काम सोनीने केले होते. तशी कबुली त्याने जवाबात दिली आहे. सोनी हा हवाला एजंट असून मोठमोठ्या रकमेची देवाणघेवाण करण्याचे काम तो करतो. पणजीत त्याचे कार्यालयही आहे.
दरम्यान, कामत यांच्या अटकपूर्व जामीन अर्जावर आता १२ आॅगस्ट रोजी सुनावणी होणार आहे. (प्रतिनिधी)