कल्याणचा ‘जिहादी’ तरुण सीरियात ठार

By Admin | Updated: August 28, 2014 03:45 IST2014-08-28T03:45:20+5:302014-08-28T03:45:20+5:30

‘इस्लामिक स्टेट आॅफ इराक अँड सीरिया’ या बंडखोर संघटनेने (आयएसआयएस) चालविलेल्या ‘जिहाद’मध्ये सामील होण्यास गेल्याचा संशय असलेला आरीब माजीद हा कल्याणचा तरुण सीरियातील संघर्षात ठार झाल्याचे वृत्त आहे

Kalyan's 'Jihadi' killed in Syria | कल्याणचा ‘जिहादी’ तरुण सीरियात ठार

कल्याणचा ‘जिहादी’ तरुण सीरियात ठार

मुंबई : सीरिया व इराक या दोन अरब देशांमधील प्रस्थापित सत्ता उलथून टाकून तेथे ‘इस्लामी खिलाफत’ स्थापन करण्यासाठी ‘इस्लामिक स्टेट आॅफ इराक अँड सीरिया’ या बंडखोर संघटनेने (आयएसआयएस) चालविलेल्या ‘जिहाद’मध्ये सामील होण्यास गेल्याचा संशय असलेला आरीब माजीद हा कल्याणचा तरुण सीरियातील संघर्षात ठार झाल्याचे वृत्त आहे. मात्र त्याच्या कुटुंबीयांकडून दुजोरा मिळालेला नाही. आरीब माजीदसोबत इराकला गेलेला साहीम टंकी याने मंगळवारी आपल्या कुटुंबीयांना फोन करून ही माहिती दिली व माजीदच्या कुटुुंबीयांनाही हे कळविण्यास सांगितले.
नवी मुंबईतील काळसेकर महाविद्यालयात आरीब माजीद हा अभियांत्रिकीच्या तिसऱ्या वर्गात शिकत होता. कल्याणचे डॉक्टर एजाज माजीद यांचा तो मुलगा होता. या माहितीवर प्रतिक्रियेसाठी एजाज कुटुंबीय उपलब्ध झाले नाही, तरी त्यांच्या नातेवाइकांनी टंकीने फोन केल्याचे मान्य केले.

Web Title: Kalyan's 'Jihadi' killed in Syria

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.