कल्याणकर गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरू

By Admin | Updated: September 7, 2015 00:54 IST2015-09-07T00:54:30+5:302015-09-07T00:54:30+5:30

गडचिरोली येथील गोंडवाना विद्यापीठाच्या कुलगुरूपदी नांदेड येथील यशवंत महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. नामदेव व्यंकटराव कल्याणकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे

Kalyankar is the Vice Chancellor of Gondwana University | कल्याणकर गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरू

कल्याणकर गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरू

मुंबई : गडचिरोली येथील गोंडवाना विद्यापीठाच्या कुलगुरूपदी नांदेड येथील यशवंत महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. नामदेव व्यंकटराव कल्याणकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी पाच वर्षांसाठी ही नियुक्ती केली आहे. नांदेडच्या स्वामी रामानंदतीर्थ मराठवाडा विद्यापीठाशी संलग्न असलेल्या यशवंत महाविद्यालयात सध्या ते प्राचार्य म्हणून कार्यरत आहेत. १९९५मध्ये डॉ. कल्याणकर यांनी या महाविद्यालयात संगणकशास्त्र व माहिती तंत्रज्ञान विभागाचे प्रमुख म्हणून सूत्रे हाती घेतली.

Web Title: Kalyankar is the Vice Chancellor of Gondwana University

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.