कल्याण: पोस्टर फाडलं म्हणून कार्यकर्त्याच्या अंगावर घातली गाडी
By Admin | Updated: October 29, 2015 16:25 IST2015-10-29T16:25:53+5:302015-10-29T16:25:53+5:30
प्रचाराचे पोस्टर फाडलं म्हणून एका पक्षाच्या कार्यकर्त्यांनी दुस-या पक्षाच्या कार्यकर्त्यावर गाडी चढवल्याची धक्कादायक घटना कल्याणमध्ये घडली आहे.

कल्याण: पोस्टर फाडलं म्हणून कार्यकर्त्याच्या अंगावर घातली गाडी
ऑनलाइन लोकमत
कल्याण, दि. २९ - प्रचाराचे पोस्टर फाडलं म्हणून एका पक्षाच्या कार्यकर्त्यांनी दुस-या पक्षाच्या कार्यकर्त्यावर गाडी चढवल्याची धक्कादायक घटना कल्याणमध्ये घडली आहे. याप्रकरणी पोलिसांनी दोन जणांना ताब्यात घेतले आहे.
विरोधी पक्षातील काही कार्यकर्ते भारतीय जनता पक्षाच्या उमेदवार गुडिया सिंह यांचे पोस्टर फाडत होते. त्याबद्दल सिंह यांचे दीर रितेश यांनी त्या कार्यकर्त्यांना जाब विचारला असता दोन्ही गटांमध्ये वाद झाला आणि त्याचे रुपांतर हाणामारीत झाले. या घटनेनंतर विरोधी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी तिथून पळ काढला असता रितेश यांनी इतर साथीदारांसह त्यांचा पाठलाग केला. मात्र पोस्टर फाडणाऱ्या कार्यकर्त्यांनी रितेश यांच्या अंगावर गाडी चढवली, ज्यात ते गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर सध्या कल्याणमधील श्रीदेवी रूग्णालयात उपचार सुरू आहेत.