कल्याण: ३ मुलांना विष पाजून महिलेची आत्महत्या
By Admin | Updated: October 27, 2016 12:32 IST2016-10-27T11:33:20+5:302016-10-27T12:32:48+5:30
कल्याणजवळील मोहाने येथील कातकरी पाड्यावर एका महिलेने तीन मुलांससह विष पिऊन आत्महत्या केली.

कल्याण: ३ मुलांना विष पाजून महिलेची आत्महत्या
ऑनलाइन लोकमत
कल्याण, दि. २७ - कल्याणजवळील मोहाने येथील कातकरी पाड्यावर एका महिलेने तीन मुलांससह विष पिऊन आत्महत्या केली. या दुर्दैवी घटनेत महिला व तिची दोन मुले मरण पावली असून तिसरा मुलगा रुग्णालयात मृत्यूशी झुंज देत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मोहोने येथे राहणारी लक्ष्मी प्रदीप वाघे(28), मुलगी नाजूका प्रदीप वाघे (10) आणि मुलगा वंश प्रदीप वाघे (7) अशी मयतांची नावे आहेत. तर विशाल वाघे या मुलाला मुंबईच्या सायन हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले आहे. लक्ष्मी यांचे त्यांचा पती प्रदीप यांच्यशी जोरदार भांडण झाल्यानंतर त्यांनी हे आत्मघातकी पाऊल उचलले आणि स्वत:सह मुलांचे जीवनही संपवले.
प्रदीप वाघे यांचा मासे पकडण्याचा व्यवसाय असून काल रात्री लक्ष्मी यांनी प्रदीपना मासे पकडम्यास जाण्यास सांगितले. मात्र रात्री खूप पाणी असल्याने मासे पकडता येत नाही असे सांगत प्रदीपने जाण्यास नकार दिला असता त्या दोघांमध्ये रोजदार भांडण झाले. त्यानंतर आज सकाळी प्रदीप मासे पकडण्यास गेले असता चिडलेल्या लक्ष्मीने तीन मुलांना विष पाजून स्वत:ही आत्महत्या केली. या प्रकरणी खडकपाडा पोलीस अधिक तपास करीत आहेत.