शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
4
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
5
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
6
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
7
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
8
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
9
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
10
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
11
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
12
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
13
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
14
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
15
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
16
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
17
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
18
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
19
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
20
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
Daily Top 2Weekly Top 5

कल्याण-नाशिक लोकल तांत्रिक कारणास्तव लांबणीवर

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2019 06:29 IST

कल्याण-नाशिक मार्गावर चालवण्यासाठी जादा क्षमतेच्या लोकल कुर्ला कारशेडमध्ये दाखल झाल्या आहेत. मात्र घाटातील प्रवासाच्या दृष्टीने या गाड्यांचे ‘सॉफ्टवेअर अपग्रेडशन’ करण्यास काही काळ लागणार आहे.

मुंबई  - कल्याण-नाशिक मार्गावर चालवण्यासाठी जादा क्षमतेच्या लोकल कुर्ला कारशेडमध्ये दाखल झाल्या आहेत. मात्र घाटातील प्रवासाच्या दृष्टीने या गाड्यांचे ‘सॉफ्टवेअर अपग्रेडशन’ करण्यास काही काळ लागणार आहे. त्यामुळे तूर्तास तरी ही लोकल सेवा लांबणीवर पडली आहे.कारशेडमध्ये गाडीची सर्व तांत्रिक सुसज्जता झाल्यानंतर या लोकलची चाचणी घेण्यात येईल. कसारा घाटात या लोकलची खरी परीक्षा आहे. त्यासाठीच सर्व तांत्रिक बाबींवर विशेष लक्ष दिले जात आहे. सुखरूप प्रवासाची खात्री झाल्यावरच ही चाचणी होईल. त्यात रेल्वे सुरक्षा आयुक्तांची मान्यता मिळेल. मगच लोकल सेवा सुरू करण्याचा अंतिम निर्णय घेतला जाईल. लोकलच्या चाचणीसाठीच दीड ते दोन महिन्यांचा कालावधी लागणार असल्याची माहिती मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी दिली.बºयाच कालावधीपासून कल्याण-नाशिक लोकलची चर्चा सुरू आहे. मात्र कल्याण-नाशिक लोकलने प्रवास करण्याची प्रवाशांची इच्छा पूर्ण होण्यासाठी काही काळ वाट पाहावी लागणार आहे. अद्याप लोकलच्या चाचण्या सुरूझाल्या नाहीत.या लोकलमध्ये अत्यावश्यक ब्रेक सिस्टीम, उच्च दाब शक्ती, इलेक्ट्रिकल मल्टिपल युनिट्स ट्रेनसह ३२ चाकांना पार्किंग ब्रेकची सुविधा देण्यात आली आहे. या नव्या लोकलची ताशी शंभर किमी वेगाने धावण्याची क्षमता आहे.चाचणीनंतर पुढील निर्णयरेल्वे प्रशासनाच्या वतीने लोकल चाचणीसाठीचे सर्व प्रयत्न सुरू आहेत. चेन्नई येथील इंटिग्रल कोच फॅक्टरीतून विशेष लोकल तयार करून आणली आहे. ही लोकल विशेषत: घाटावर चालण्यासाठी योग्य असते. सर्व तांत्रिक बाबी पडताळण्यात येणार असून रेल्वे सुरक्षा विभागाची मंजुरी घेऊन लोकलची चाचणी केली जाणार आहे. या लोकलची चाचणी झाल्यावरच पुढील निर्णय घेण्यात येईल, अशी माहिती मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी सुनील उदासी यांनी दिली.

टॅग्स :localलोकलMumbai Localमुंबई लोकलkalyanकल्याणNashikनाशिकIndian Railwayभारतीय रेल्वे