कल्याण-डोंबिवलीकरांनाही हवी ‘मेट्रो रेल्वे’
By Admin | Updated: November 24, 2014 03:12 IST2014-11-24T03:12:40+5:302014-11-24T03:12:40+5:30
दहीसर -मानखुर्द आणि वडाळा -कसारावडवली या मेट्रो प्रकल्पांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंजूरी दिल्याने मुंबई-ठाणेकरांना सात वर्षांनी का होईना दिलासा मिळाला आहे

कल्याण-डोंबिवलीकरांनाही हवी ‘मेट्रो रेल्वे’
अनिकेत घमंडी, डोंबिवली
दहीसर -मानखुर्द आणि वडाळा -कसारावडवली या मेट्रो प्रकल्पांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंजूरी दिल्याने मुंबई-ठाणेकरांना सात वर्षांनी का होईना दिलासा मिळाला आहे. मात्र कळवा, मुंब्रा, दिवा, डोंबिवलीसह अंबरनाथ, उल्हासनगर या ठिकाणच्या तब्बल २५ लाखांहून अधिक रहीवाश्यांमध्ये मात्र पुन्हा सापत्न वागणूक मिळाल्याची भावना आहे. मेट्रोपासून वंचित ठेवल्याने येथील रहिवासी आमदार रवींद्र चव्हाण, सुभाष भोईर, गणपत गायकवाड आणि नरेंद्र पवार यांना जाब विचारत आहेत.
मुळातच डोंबिवलीहून रेल्वेतून प्रवास करणाऱ्या सुमारे ६ लाख (रेल्वेच्या माहितीनूसार) प्रवाशांना रोजचा प्रवास त्रासाचा झाला आहे. वाहतूक -कोंडीनेही नागरिकांना त्रस्त केले आहे. त्यामुळे शिळफाटा-पनवेल अथवा वाशीला जाणाऱ्या प्रवाशांनाही अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. मेट्रोचा प्रस्ताव आणि प्रकल्प या ठिकाणी आला तर घाटकोपर-वर्सोवा अथवा पश्चिम उपनगरात जाणाऱ्यांना मोठा दिलासा मिळेल. त्यामुळे हजारो प्रवासी हे रेल्वेने ताटकळत जाण्यापेक्षा मेट्रोने प्रवासाचा पर्याय स्वीकारतील.