कल्याण-डोंबिवलीत धूमस्टाईल चोरी
By Admin | Updated: December 26, 2014 04:19 IST2014-12-26T04:19:35+5:302014-12-26T04:19:35+5:30
कल्याण-डोंबिवली शहरात चोरट्यांचा हैदोस चालूच असून रिक्षातून प्रवास करणाऱ्या स्मिता इंगळे महिलेला लक्ष्य करण्यात आल्याची घटना बुधवारी रात्री कल्याण शहरात घडली
कल्याण-डोंबिवलीत धूमस्टाईल चोरी
कल्याण : कल्याण-डोंबिवली शहरात चोरट्यांचा हैदोस चालूच असून रिक्षातून प्रवास करणाऱ्या स्मिता इंगळे महिलेला लक्ष्य करण्यात आल्याची घटना बुधवारी रात्री कल्याण शहरात घडली. या वेळी झालेल्या
झटापटीत ही महिला रिक्षातून
खाली पडल्याने तिच्या हातापायाला गंभीर दुखापत झाली आहे.
इंगळे या सॉफ्टवेअर इंजिनीअर असून, त्या अंधेरी येथे कामाला आहेत. कल्याणमधील रामबाग परिसरात राहणाऱ्या इंगळे बुधवारी रात्री कामावरून घरी येण्यासाठी निघाल्या. कल्याण रेल्वे
स्थानक गाठल्यानंतर त्यांनी घरी जाण्यासाठी रिक्षा पकडली. घराच्या दिशेने येत असताना रामबाग
लेन ४मधील गुरुनानक शाळेजवळ धूम स्टाइलने रिक्षाच्या मागून येणाऱ्या मोटारसायकलवरील चोरट्यांनी त्यांच्या हातातील पर्स खेचून पलायन केले. अचानक घडलेल्या घटनेने
त्या गडबडून गेल्या आणि या झटापटीत त्या रिक्षातून खाली पडल्या. या घटनेत त्यांच्या हातापायाला गंभीर दुखापत झाली असून त्यांना उपचारार्थ खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
अशा प्रकारच्या वाढत्या घटनांनी महिलावर्गात घबराटीचे वातावरण पसरले असून आता या घटनांमध्ये जिवावर बेतण्यासारखे प्रसंग घडू लागल्याने संतापाची भावना व्यक्त होत आहे. या चोरीच्या घटनांवर पोलिसांचे कोणतेही नियंत्रण राहिलेले नाही, हे या घटनांमधून समोर आले आहे. (प्रतिनिधी)