शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी तुमची अनेक प्रकरणे पाहिली आहेत; बोललो तर उगाच...", CJI गवईंनी ईडीला फटकारले
2
BJP Candidate list: भाजपने १० विद्यमान आमदारांची तिकिटं कापली, ५ जण आहेत माजी मंत्री; पहिल्या यादीमध्ये कोण?
3
लष्कराकडून जेन-Z वर गोळीबार करण्यास नकार, जीव वाचवून राष्ट्रपती देशाबाहेर पसार, या देशात अराजक
4
...अन् हमासने बिपिन जोशीचा मृतदेहच सोपवला, लेकाच्या सुटकेसाठी अमेरिकेचेही दार ठोठावणाऱ्या आईवर मोठा 'आघात'
5
विक्रमी वाढ, चांदी १,९५,००० रुपयांवर, इतिहासात प्रथमच एका दिवसात १५,००० रुपयांनी महागली
6
अखेर मुहूर्त सापडला! वैभव खेडेकरांचा भाजपा प्रवेश झाला, मनसेला फटका, राजकीय समीकरणे बदलणार
7
स्वेटर, कानटोपी, हातमोजे अन् ब्लँकेट...! तयार रहा, ८६ टक्के हिमालयाला बर्फाने आच्छादले
8
भूतबाधा उतरवण्याच्या नावाखाली भोंदूबाबाचा महिलेवर बलात्कार; व्हिडिओ रेकॉर्ड करून ब्लॅकमेल!
9
टाटाची दिवाळीपूर्वीच शॉपिंग! जगात दबदबा वाढविण्यासाठी चिनी कंपनीच घेतली विकत
10
असाही असतो बॉस! कामाचा ताण नाही, फक्त मनसोक्त आराम; म्हणाले दिवाळीत २ किलो वजन वाढवून या
11
प्रेमानंद महाराजांना नेमका कोणता आजार झालाय? यात मृत्यूचा धोका आहे का? जाणून घ्या...
12
हवेतच कतार एअरवेजच्या विमानात बिघाड; अहमदाबादमध्ये इमर्जन्सी लँडिंग, मोठा अपघात टळला!
13
"महाराष्ट्रात राहायची लायकी नाही", बिकिनीतील फोटोंवर आक्षेपार्ह कमेंट, अभिनेत्रीचं सडेतोड उत्तर, म्हणाली...
14
LIC कडून दिवाळीचा 'डबल धमाका'! मध्यमवर्गीयांसाठी २ नवीन 'रिस्क फ्री' योजना लाँच, शेअर झाला रॉकेट
15
मंत्रिमंडळ मोठे निर्णय! बांबू उद्योग धोरण जाहीर, ५ लाख रोजगार; मुंबई HC मध्ये २२२८ पदांना मान्यता
16
राज ठाकरे पहिल्यांदाच ‘मविआ’ नेत्यांसोबत दिसले; CM फडणवीस म्हणाले, “भाजपा अन् महायुती...”
17
हरयाणात काय चाललंय? ASI ची गोळी झाडून आत्महत्या; दिवंगत IPS पूरन कुमार यांच्यावर गंभीर आरोप
18
"अशी निवडणूक पद्धत भारतात कुठेच नाही, मग फक्त महाराष्ट्रातच का लागू आहे?"; निवडणूक आयोगाला घेरले, 'मविआ'च्या पत्रात काय?
19
१९९० मध्ये १ किलो सोन्याची किंमत मारुती ८०० एवढी होती, आज लँड रोव्हरएवढी झालीय, २०४० मध्ये...; उद्योगपतीने हिशेबच मांडला
20
पैसाच पैसा! माकडाने पळवली ५० हजारांची बॅग; झाडावर चढला, केला ५०० रुपयांच्या नोटांचा वर्षाव

कल्याणमधील 'तो' अ‍ॅसिड हल्ला बनावट; UPSC करणाऱ्या तरुणीचे बिंग पोलिसांनी 'असं' फोडलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 26, 2024 17:43 IST

कल्यामध्ये तरुणीवर अ‍ॅसिड हल्ला झाल्याच्या प्रकरणात कोळसेवाडी पोलिसांनी धक्कादायक खुलासा केला आहे.

Kalyan Acid Attack : काही दिवसांपूर्वी कल्याणमध्येकेंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेची तयारी करणाऱ्या तरुणीवर अ‍ॅसिड हल्ला केल्याचा प्रकार समोर आला होता. अंधेरी येथे राहणाऱ्या तरुणीवर कल्याण पूर्वेकडील पार्किंग परिसरात दोन चोरट्यांनी अ‍ॅसिड हल्ला करुन तिच्याकडील लॅपटॉप घेऊन पळ काढल्याची तक्रार करण्यात आली होती. अ‍ॅसिड हल्ल्यामुळे तरुणी काही प्रमाणात जखमी झाली होती तर तिचे कपडे देखील जळाले होते. या प्रकरणी कोळसेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आल्यानंतर तपास सुरुवात करण्यात आला होता. पोलीस तपासात तरुणीने सांगितल्याप्रमाणे काहीच घडलं नसल्याचे धक्कादायक सत्य समोर आलं आहे.

१८ मे रोजी कल्याण स्टेशन परिसरात दोन चोरट्यांनी आपल्यावर अ‍ॅसिड हल्ला करुन मित्राचा लॅटपॉप घेऊन पळ काढल्याची तक्रार अंजली पांडे नावाच्या तरुणीने पोलिसांत दिली होती. अंजलीच्या म्हणण्यांनुसार ती अंधेरीवरुन मित्राला लॅपटॉप देण्यासाठी कल्याणला गेली होती. मात्र चोरट्यांनी आपल्यावर हल्ला करुन तो लांबवला असे अंजलीने म्हटलं होतं. मात्र पोलीस तपासात अंजलीने अ‍ॅसिड हल्ल्याचा बनाव रचल्याचे समोर आलं आहे. केवळ काही पैशांसाठी तिने हे सगळं कृत्य केल्याचे उघड झालं आहे.

नेमकं काय घडलं?

अंधेरी इथे राहणाऱ्या अंजलीला कल्याणमधील तिच्या एका मित्राने यूपीएस परीक्षेच्या तयारीसाठी त्याचा लॅपटॉप दिला होता. अंजली लॅपटॉपच्या मदतीने अभ्यास करेल, अशी प्रामाणिक भावना त्याच्या मनात होती. मात्र मित्राच्या मदतीचा गैरफायदा अंजलीने घेतला आणि अभ्यास करण्याऐवजी अ‍ॅसिड हल्ल्याचा बनाव रचला आणि लॅपटॉप विकून टाकला. पोलिसांनी सीसीटीव्हीच्या माध्यमातून हा सगळा धक्कादायक प्रकार उघडकीस आणला आहे.

बरेच दिवस झाल्याने मित्राने अंजलीकडे लॅपटॉप परत मागण्यास सुरुवात केली होती. मात्र पैशांची चणचण असल्याने तिने लॅपटॉप परत देण्याऐवजी तो विकून टाकण्याचा निर्णय घेतला. अंजलीने लॅपटॉप विकून पैसे मिळवले पण मित्राला परत काय द्यायचे या विचारात ती होती. अशातच तिने अ‍ॅसिड हल्ल्याची योजना आखली आणि लॅपटॉप चोरीला गेल्याचे सांगितले. योजनेनुसार अंजलीने १८ मे रोजी ७.३० वाजण्याच्या सुमारास कल्याण पूर्वकडीलएका दुकानातून कास्टिंग सोडा विकत घेतला आणि स्वत:च्या अंगावर फासला. यामुळे तिच्या मानेवर जखमेसारखे डाग दिसू लागले. त्यानंतर तिने चोरट्यांनी हल्ला करुन लॅपटॉप चोरल्याची तक्रार कोळसेवाडी पोलिसांत केली.

दरम्यान, घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी तपास सुरु केला. आजूबाजूचे सीसीटीव्ही तपासत असताना पोलिसांना अंजली एका दुकानातून कास्टिंग सोडा विकत घेत असल्याची आढळली. पोलिसांनी दुकानात जाऊन याची चौकशी केली असता दुकानदाराने याची पुष्टी केली. त्यामुळे पोलिसांना अंजलीवर संशय बळावला आणि त्यांनी तिची चौकशी सुरु केली. पोलिसांच्या चौकशीत अंजलीने सगळी हकीकत सांगितली आणि पैशांसाठी लॅपटॉप विकल्याची कबुली दिली. पोलिसांना खोटी माहिती देऊन दिशाभूल केल्याप्रकरणी पोलिसांकडून आता अंजलीवर कारवाई करण्यात येत आहे.

टॅग्स :kalyanकल्याणCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसupscकेंद्रीय लोकसेवा आयोग