कळंबोली उड्डाणपूल वाहतुकीसाठी खुला
By Admin | Updated: May 21, 2016 03:04 IST2016-05-21T03:04:06+5:302016-05-21T03:04:06+5:30
राष्ट्रीय महामार्ग ४ वर तळोजा एमआयडीसी यांना जोडणारा ९९१ मीटर लांबीचा उड्डाणपूल शुक्रवारी वाहतुकीसाठी खुला करण्यात आला.

कळंबोली उड्डाणपूल वाहतुकीसाठी खुला
नवी मुंबई : राष्ट्रीय महामार्ग ४ वर तळोजा एमआयडीसी यांना जोडणारा ९९१ मीटर लांबीचा उड्डाणपूल शुक्रवारी वाहतुकीसाठी खुला करण्यात आला. यासाठी ५१ कोटी ६८ लाख रूपये खर्च करण्यात आले आहेत.
या परिसरामधील वाहतूक कोंडी वाढू लागली होती. वाहतुकीची समस्या सोडविण्यासाठी सिडकोने डिसेंबर २०११ मध्ये उड्डाणपुलाचे बांधकाम हाती घेतले होते. उड्डाणपुलाचे काम पूर्ण होताच २० मे रोजी तत्काळ हा पूल वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे. यामुळे तळोजा औद्योगिक वसाहतीकडे जाणारी वाहतूक सुरळीत होणार आहे. पूर्वी याठिकाणी रेल्वे फाटक ओलांडून जावे लागत होते. यामुळे वाहतुकीचा खोळंबा होवून अपघातही होवू लागले होते. ही समस्या सोडविण्यासाठी सिडकोने चार पदरी उड्डाणपुलाची उभारणी केली आहे. सिडकोने काम पूर्ण होताच तत्काळ वाहतुकीला खुला केल्यामुळे नागरिकांनीही समाधान व्यक्त केले आहे.