शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
3
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
4
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
5
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
6
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
7
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
8
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
9
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
10
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
11
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
12
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
13
मैत्रिणीचे लग्न आटोपून घरी येताना अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, ९ जणांना अटक
14
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
15
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
16
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
17
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
18
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
19
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे

काजोल आहे देवेंद्र फडणवीस यांची आवडती अभिनेत्री, लोकमतच्या पुरस्कार सोहळ्यात अमृता फडणवीस यांचा खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 15, 2017 13:16 IST

लोकमतच्या महाराष्ट्राज मोस्ट स्टायलिश अवॉर्ड्स 2017 सोहळ्यात बोलताना अमृता फडणवीस यांनी काजोल माझे पती देवेंद्र फडणवीस यांची आवडती अभिनेत्री असल्याचा खुलासा केला

मुंबई - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आवडती अभिनेत्री कोण आहे याचा खुलासा त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी केला आहे. लोकमतच्या महाराष्ट्राज मोस्ट स्टायलिश अवॉर्ड्स 2017 सोहळ्यात बोलताना अमृता फडणवीस यांनी काजोल माझे पती देवेंद्र फडणवीस यांची आवडती अभिनेत्री असल्याचा खुलासा केला. यावेळी अमृता फडणवीस यांच्या हस्ते काजोलला महाराष्ट्राज मोस्ट स्टायलिश ग्लॅमर आयकॉन पुरस्कार देण्यात आला. विशेष म्हणजे यावेळी अमृता फडणवीस यांनी आशिकी चित्रपटातील 'तुम ही हो' गाणंही गायलं.

अभिनेत्री काजोलने यावेळी बोलताना आई तनुजाच आपली खरी स्टाईल आयकॉन असल्याचं सांगितलं. यावेळी आपली आई ज्येष्ठ अभिनेत्री तनुजा यांच्याबद्दल बोलताना काजोल थोडी भावूक झालेली पहायला मिळाली.  'आईचे चित्रपट मी फारसे पाहिले नाहीत. कारण त्यानेळी हजारो मुलं माझ्या आईला आई बोलत होती आणि ते मला आवडत नसायचे. त्यामुळे मी आईचे चित्रपट पाहिले नाहीत', अशी आठवण काजोलने शेअर केली.  आईची स्टाईल इतरांपेक्षा वेगळीच होती, आणि ती माझी आवडती आहे असंही काजोलने सांगितलं. स्टाईल हा शब्द फक्त कपड्यांपुरता मर्यादीत नाही. प्रत्येक गोष्टीत स्टाईल करायला आवडते असं काजोलने सांगितलं. 

लोकमतच्या महाराष्ट्राज मोस्ट स्टायलिश अवॉर्ड्स 2017 पुरस्कार सोहळ्याचे हे दुसरे वर्ष आहे. साई रिअल इस्टेट प्रस्तुत या सोहळ्याची गेल्या काही दिवसांपासून प्रचंड उत्कंठा निर्माण झाली होती.  मुंबईतील ताज लँडस् एण्ड हॉटेलमध्ये अतिशय स्टायलिश अंदाजात हा सोहळा सुरु आहे. सोहळ्यात चारचाँद लावण्यासाठी बॉलीवुडसह मराठी चित्रपटसृष्टीतील अनेक स्टायलिश सेलिब्रिटी उपस्थित आहेत. त्याचबरोबर सामाजिक, राजकीय, आर्थिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांचीही उपस्थिती आहे. 

लोकमत महाराष्ट्राज् मोस्ट स्टाइलिश अवॉर्ड सोहळ्याचे प्रोगेस पार्टनर कार्लटन, स्टार कॉस्मेटिक्स, जॉनी वॉकर तसेच झूम ,पिंक व्हिला, अफॅक्स आणि झी मराठी पार्टनर आहे.या सोहळ्यात मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टी तसेच टीव्ही जगतातील कलाकारांना पुरस्कार देऊन गौरवण्यात येत आहे. आजवर आपण अनेक पुरस्कार सोहळे पाहिले असतील मात्र लोकमतच्या वतीने आयोजित हा सोहळा थोडा हटके आणि खास आहे. कारण महाराष्ट्राच्या मोस्ट स्टाइलिश पर्सनालिटीजलाच या पुरस्काराचे मानकरी होता येत आहे. या सोहळ्याला विविध सेलिब्रिटींची उपस्थिती लाभली आहे. 

ट्रॉफीही स्टायलिशमहाराष्ट्रातील मोस्ट स्टायलिश लोकांना गौरवान्वित करण्यासाठी तशीच स्टायलिश ट्रॉफीही यंदा तयार करण्यात आली आहे. स्टायलिश महिला असो वा स्टायलिश पुरुष, दोघांचाही गौरव करण्यासाठी ही ट्रॉफी तयार करताना विचार करण्यात आला आहे. एका बाजूला लावण्य रुपी महिला तर मागच्या बाजूला बलदंड पुरूष साकारून डिझाइनचा एक नवा स्टायलिश आदर्श नमुनाच या निमित्ताने तयार करण्यात आला आहे़ अशा प्रकारची ट्रॉफी यापूर्वी कधीच तयार झाली नाही. 

टॅग्स :LMMS Awards 2017लोकमत महाराष्ट्राज मोस्ट स्टाइलिश अवॉर्ड्स २०१७