कबीर बेदी, नीला सत्यनारायण करणार ‘लोकमत वुमेन समिट’मध्ये मार्गदर्शन
By Admin | Updated: November 27, 2014 23:16 IST2014-11-27T23:16:18+5:302014-11-27T23:16:18+5:30
कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून निवृत्त झालेल्या नीला सत्यनारायण यांचे विचार ऐकण्याची संधी एनईसीसीच्या सहयोगाने आयोजित ‘लोकमत वुमेन समिट 2क्14’मध्ये मिळणार आहे.

कबीर बेदी, नीला सत्यनारायण करणार ‘लोकमत वुमेन समिट’मध्ये मार्गदर्शन
पुणो : बॉलिवूडसह आंतरराष्ट्रीय चित्रपटांमध्ये ठसा उमटविलेले अभिनेते कबीर बेदी यांच्यासह 37 वर्षाच्या प्रशासकीय सेवेतून कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून निवृत्त झालेल्या नीला सत्यनारायण यांचे विचार ऐकण्याची संधी एनईसीसीच्या सहयोगाने आयोजित ‘लोकमत वुमेन समिट 2क्14’मध्ये मिळणार आहे. लोकमत माध्यम समूहाच्या वतीने मंगळवार, दि. 2 डिसेंबर रोजी ही एकदिवसीय परिषद पुण्यात हॉटेल हयात येथे होणार आहे.
4नीला सत्यनारायण : नीला सत्यनारायण यांना महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाच्या पहिल्या महिला आयुक्त होण्याचा मान मिळाला. निवडणूक आयुक्त म्हणून नि:पक्षपणो काम करीत त्यांनी आपला ठसा उमटविला. भारतीय प्रशासकीय सेवेतील (आयएएस) 37 वर्षाच्या प्रदीर्घ कारकिर्दीत विविध पदांची जबाबदारी त्यांनी कणखरपणो सांभाळली. महसूल, गृह, वन, सामाजिक, माहिती आणि जनसंपर्क, वैद्यकीय, ग्रामविकास आणि सरकारमधील इतर विभागांमध्ये त्यांनी महत्त्वाची पदे सांभाळली आहेत. कर्तव्यदक्ष महिला अधिकारी म्हणून त्यांनी केलेल्या कामाचे प्रशासकीय वतरुळात नेहमीच कौतुक झाले आहे. साहित्य आणि संगीतातही त्यांची स्वतंत्र ओळख आहे. त्यांनी सुमारे 15क् गाणी शब्दबद्ध केली असून, काही मराठी चित्रपट व दोन हिंदी चित्रपटांना संगीतही दिले आहे. साहित्य व सांस्कृतिक क्षेत्रत त्यांना विविध पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आहे.
4 कबीर बेदी : आकर्षक व्यक्तिमत्त्व, भारदस्त आवाज आणि शानदार जीवनशैलीमुळे कबीर बेदी यांनी बॉलिवूडसह आंतरराष्ट्रीय चित्रपटांमध्येही आपला ठसा उमटविला आहे. हिंदी चित्रपटसृष्टीत ते चरित्र अभिनेता म्हणून प्रसिद्ध आहेत. मॉडेलिंग क्षेत्रपासून त्यांनी आपल्या करिअरला सुरुवात केली. रंगभूमीवरही त्यांनी काही काळ गाजविला. पुढे चित्रपट व टीव्ही मालिकांमधून बेदी यांनी स्वतंत्र ओळख निर्माण केली. जेम्स बॉन्ड चित्रपटांमध्ये काम करणारे ते एकटे भारतीय अभिनेते आहेत. पंजाबी परिवारात जन्मलेल्या बेदी यांनी चित्रपटसृष्टीत आल्यानंतर इतर अभिनेत्यांना मागे टाकत आंतरराष्ट्रीय स्तरावर पदार्पण केले. इटलीशीही त्यांचा अनेक वर्षापासून संबंध राहिला. 1974मध्ये ‘संदोकान’ या टीव्ही मालिकेतून इटली व युरोपीय देशांमध्ये त्यांनी प्रसिद्धी मिळविली आहे. तसेच इटलीतील चित्रपटांमध्येही त्यांनी काम केले आहे. त्यांना इटलीचा ‘कैवेलियर’ (शूरवीर) हा सर्वोच्च नागरी सन्मानही नुकताच जाहीर झाला आहे.