कबड्डी हाच आपला ‘आत्मा’

By Admin | Updated: July 14, 2014 22:56 IST2014-07-14T22:56:22+5:302014-07-14T22:56:22+5:30

कबड्डी दिन विशेष : शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त कबड्डीपटू सीताराम तायडे यांचे मत

Kabaddi is our 'soul' | कबड्डी हाच आपला ‘आत्मा’

कबड्डी हाच आपला ‘आत्मा’

खामगाव : कुठल्याही चांगल्या गोष्टीवर प्रेम केल्यास त्या गोष्टीतून, खेळातून भगवंतांची प्राप्ती होते. प्रामाणिकपणे कबड्डीचा ध्यास घेतला.. कबड्डीनेच मला घडविले.. माझ्या कुटूंबाला सावरले..त्यामुळे कबड्डी हा खेळच आपला आत्मा असल्याचे मत शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त कबड्डी पटू सीताराम तायडे यांनी लोकमतशी बोलताना व्यक्त केले. कबड्डी दिवसाच्या पुर्व संध्येला त्यांना बोलते केले असता, त्यांनी कबड्डी विषयी आपल्या मनातील भावना व्यक्त केल्या. कबड्डी या खेळातच आपल्याला भगवंताचे दर्शन होते. कबड्डीच्या सातत्यपूर्ण उच्चारामुळे प्राणायमाचे धडेही मिळतात. त्यामुळे कबड्डी हा आपला आत्मा असल्याचे त्यांनी सांगितले. मैदानी खेळातून शरीर निरोगी राहू शकते. निरोगी शरिरातच भगवंताचा वास असतो. प्रत्येक शुभ कार्यात भगवंत आहे. प्रदुषण आणि रासायनिक खतांच्या अन्न धान्यापासून मैदानी खेळच वाचवू शकतात. टिव्ही आणि इंटरनेटच्या जमान्यात मैदानी खेळाची नाळं तुटता कामा नये, अशी अपेक्षाही त्यांनी शेवटी व्यक्त केली.

** कष्ट केल्या निश्‍चित फलश्रृती!

जिद्द, चिकाटी आणि प्रामाणिकता हीच यशाची त्रिसुत्री आहे. या त्रिसुत्रीनेच जीवनात यशस्वी झालो. माझ्या यशात पत्नी गीता आणि माझ्यावर प्रेम करणार्‍या असंख्य खेळाडूंचा वाटा आहे. कबड्डीनेच आपणास नोकरी दिली, कुटूंब सावरले. त्यामुळे माझ्या मुलींसह मुलांनीही या क्षेत्रात वाहून घेतले आहे. कबड्डीमुळेच मुलगा पंकज नागपूर येथे पीएसआय होवू शकला. आपण धडे दिलेले आतापर्यंत २५0 (कबड्डीपटू )मुलं कबड्डीमुळे विविध क्षेत्रात यशस्वी झाले आहेत. यामध्ये पोलिस, वीज वितरण कंपनी, एसटी महामंडळ या सारख्या सेवेत कार्यरत आहेत. १३ मुलींनीही (महिला) कबड्डीतून आपले करिअर घडविले असून मानस कन्या कु. शारदा घोगरे दारूबंदी पोलिस म्हणून कार्यरत आहे.

** 'कबड्डी बोलो कबड्डी' या शब्दांनीच निरोप द्यावा!

मानवी जीवनात मृत्यू हा शाश्‍वत आहे. प्रत्येक चांगल्या कार्यात ह्यरामह्ण आहे. त्यामुळे माझा मृत्यू झाल्यानंतर 'राम बोलो भाई राम' याऐवजी ह्यकबड्डी बोलो भाई कबड्डीह्ण या शब्दांनीच मला निरोप द्यावा, अशीच आपली अंतिम इच्छा आहे. कुठलाही संकोच न करता माझ्या अंत्ययात्रेतील प्रत्येकाने 'कबड्डी बोलो भाई कबड्डी' या शब्दांनी निरोप देणे, हाच माझ्या कार्याचा, कबड्डीवरील प्रेमाचा गौरव ठरेल! असेही ते शेवटी म्हणाले.

** सीताराम तायडे यांचा कबड्डीचा प्रवास

१९५७ मध्ये नागपूर विद्यापीठाच्या आंतर विद्यापीठ कबड्डी स्पर्धेसाठी निवड, १९६0 मध्ये भारतीय संघात श्रीलंका दौर्‍यासाठी निवड,१९६१ मध्ये न्यूईरा शाळेत क्रीडा शिक्षक म्हणून रूजू,१९६१ अंबिका क्रीडा मंडळाची स्थापना, १९६२-१९७५ कबड्डी पटू म्हणून विविध ठिकाणी सहभाग, १९७५-२0१२ कबड्डी पंच, १९८२ मध्ये एशियाड स्पर्धेचे राज्यातील एकमेव पंच, २00५ मध्ये लोकमतच्या वर्धापनीदिनी सत्कार, २00७-0८ मध्ये शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार, २00७ खामगाव प्रेस क्लबचा जीवनगौरव पुरस्कार.

Web Title: Kabaddi is our 'soul'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.