क-हाड माझा मतदार संघ - मुख्यमंत्री
By Admin | Updated: September 17, 2014 18:35 IST2014-09-17T16:35:03+5:302014-09-17T18:35:56+5:30
दक्षिण क-हाड हा माझा मतदार संघ आहे. मी क-हाडमध्ये राहतो.मी तिथुनच निवडणुक लढवण्यासाठी इच्छुक असल्याचे पक्षश्रेष्ठींना सांगितले आहे

क-हाड माझा मतदार संघ - मुख्यमंत्री
>ऑनलाइन लोकमत
औरंगाबाद, दि. १७ - दक्षिण क-हाड हा माझा मतदार संघ आहे. मी क-हाडमध्ये राहतो. मी तिथुनच निवडणुक लढवण्यासाठी इच्छुक असल्याचे पक्षश्रेष्ठींना सांगितले आहे. याबाबत अंतिम निर्णय केंद्रीय निवडणूक समिती घेईल असे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितले आहे. ते बुधवारी मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्त येथे आले होते. त्यावेळी पत्रकारंशी बोलताना त्यांनी आपले मत व्यक्त केले.
मित्रपक्षांसोबत सुरु असलेल्या जागांच्या वाटाघाटी बाबात विचारले असता त्यांनी सांगितले की, जातीयवादी पक्षांना सत्तेवर येण्यापासून रोखण्यास आम्ही प्रयत्न करत आहोत. तसेच आम्ही ज्याप्रमाणे सर्व मतदार संघाची चाचपणी केली आहे, त्याचप्रमाणे राष्ट्रवादीनेही केली आहे. अगदीच काही झाले नाही तर आमची स्वतंत्र लढण्याची तयारी असावी म्हणून हे प्रयोजन करण्यात आल्याचे मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे. एकत्र येत पुन्हा बंडखोरी , प्रोत्साहन देणे असे होऊनये याकरता आम्ही वरीष्ठांशी केलेल्या चर्चेत प्रामाणिकपणे आघाडी करण्याचा प्रयत्न करत आहोत, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.