ज्योतीकुमारीच्या मारेकऱ्यांची फाशी कायम!
By Admin | Updated: May 9, 2015 01:31 IST2015-05-09T01:31:28+5:302015-05-09T01:31:28+5:30
संगणक अभियंता ज्योतीकुमारी चौधरी (२२) हिचे अपहरण करुन तिच्यावर बलात्कार केल्यानंतर खून करणाऱ्या दोन्ही आरोपींची फाशीची शिक्षा

ज्योतीकुमारीच्या मारेकऱ्यांची फाशी कायम!
पुणे : संगणक अभियंता ज्योतीकुमारी चौधरी (२२) हिचे अपहरण करुन तिच्यावर बलात्कार केल्यानंतर खून करणाऱ्या दोन्ही आरोपींची फाशीची शिक्षा शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयाने कायम केली. यापूर्वी सत्र न्यायालयाने सुनावलेली फाशीची शिक्षा उच्च न्यायालयाने कायम केली होती. त्यानंतर आरोपींनी सर्वोच्च न्यायालयात अपिल केले होते. त्यावर सुनावणी होऊन ही शिक्षा कायम केली़
पुरूषोत्तम बोराटे व प्रदीप कोकाटे अशी आरोपींची नावे आहेत. ज्योतीकुमारी हिंजवडीमधील विप्रो कंपनीम नोकरी करीत होती. बहीण आणि मेव्हण्यासोबत ती पाषाण येथे वास्तव्यास होती. पुरूषोत्तम बोराटे व प्रदीप कोकाटे या दोघांनी १ नोव्हेंबर २००७ रोजी तिचे अपहरण केले होते. रात्रपाळी असल्यामुळे तिला नेण्यासाठी कंपनीची मोटार आली होती. पाषाणवरुन हिंजवडीला जात असताना त्यांनी ही मोटार द्रुतगती मार्गावरील गहुंजे येथे नेली. तिच्यावर बलात्कार करुन तिचा ओढणीने गळा आवळून खून करण्यात आला. पुरावा नष्ट करण्यासाठी डोक्यामध्ये दगड घातला होता. हा मृतदेह तेथेच टाकून आरोपी पसार झाले होते. (प्रतिनिधी)