पदार्पणातच ‘ज्योती, स्वाती’ अव्वल
By Admin | Updated: February 2, 2015 04:09 IST2015-02-02T04:09:17+5:302015-02-02T04:09:17+5:30
अकलूजच्या राज्यस्तरीय लावणी नृत्य स्पर्धेतील व्यावसायिक गटात प्रथमच पर्दापण करणाऱ्या ज्योती, स्वाती पुरंदावडेकर

पदार्पणातच ‘ज्योती, स्वाती’ अव्वल
अकलूज : अकलूजच्या राज्यस्तरीय लावणी नृत्य स्पर्धेतील व्यावसायिक गटात प्रथमच पर्दापण करणाऱ्या ज्योती, स्वाती पुरंदावडेकर या पार्टीने नृत्यातील जोश, गाण्यातील आर्जव आणि संगितातील सुरेल ताल यांचा त्रिवेणी संगम साधून नावाजलेल्या पार्ट्यांवर मात करत विजेतेपद पटकावले. या पार्टीला रोख २५ हजार रुपये, स्मृतीचषक प्रदान करण्यात आले.
सहकार महर्षि शंकरराव मोहिते-पाटील जयंती समारंभ समितीतर्फे अकलूज येथे २३व्या राज्यस्तरीय लावणी नृत्य स्पर्धेत रसिकांनी उत्स्फूर्त दाद दिली.
यावेळी नागेश साळुंखे, सोलापूर निर्मित लावण्यखणी (द्वितीय), महेंद्र बनसोडे, पुणे निर्मित कैरी मी पाडाची (तृतीय), योगेश देशमुख, पुणे निर्मित तुमच्यासाठी काय पण व देवयाणी चंदगडकर, मुंबई निर्मित सोळा हजारांत देखणी यांना विभागून (चतुर्थ) क्रमांक देण्यात आला. या पार्ट्यांना अनुक्रमे २० हजार, १
५ हजार, १० हजार व स्मृतीचषक देण्यात आले.
स्पर्धेतील वैयक्तिक पारितोषिकात कैरी मी पाडाची पार्टीतील शलाका अंधारे यांना उत्कृष्ट अदेसाठी (५ हजार) तर याच पार्टीतील उत्कृष्ट ढोलकीपटू लक्ष्मी लांबे यांना (१ हजार), उत्कृष्ट पार्श्वगायिका लावण्यखणी पार्टीतील प्राजक्ता महामुनी यांना (१ हजार), उत्कृष्ट पेटीवादक तुमच्यासाठी कायपण पार्टीतील अशोक काळे यांना (१ हजार), उत्कृष्ट तबलावादक मंगेश कलामंच पार्टीतील सुरदास कुडाळकर यांना (१ हजार) तर उत्कृष्ट मुजऱ्यासाठी मंगेश कलामंचाच्या ज्योती स्वाती पुरंदावडेकर पार्टीस (३ हजार) रूपयांचे बक्षीस देण्यात आले. यावेळी लावणी कलावंत पुरस्कार प्राप्त सरलाबाई नांदोरेकर,
यंदाच्या मानकरी वैशाली जाधव-परभणीकर आदी उपस्थित होते. (वार्ताहर)