न्या. अभय ओक यांना पितृशोक

By Admin | Updated: February 14, 2017 03:46 IST2017-02-14T03:46:30+5:302017-02-14T03:46:30+5:30

मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती अभय ओक यांचे वडील आणि येथील न्यू इंग्लिश स्कूलचे माजी विश्वस्त श्रीनिवास ऊर्फ अण्णा ओक

Justice Abhay Oak, father of the father | न्या. अभय ओक यांना पितृशोक

न्या. अभय ओक यांना पितृशोक

ठाणे : मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती अभय ओक यांचे वडील आणि येथील न्यू इंग्लिश स्कूलचे माजी विश्वस्त श्रीनिवास ऊर्फ अण्णा ओक यांचे सोमवारी वयाच्या ८६ व्या वर्षी निधन झाले. सोमवारी दुपारी त्यांच्यावर जवाहर बाग स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.
श्रीनिवास ऊर्फ अण्णा हे ठाण्यातील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पहिले विभागीय संघचालक वामनराव ओक यांचे पुत्र होते. त्यांचे शालेय शिक्षण एम.एच. हायस्कूल येथे झाले. निष्णात कायदेपंडित अशी त्यांची ख्याती होती. ठाण्यातील अनेक वकिलांना त्यांनी मार्गदर्शन केले. श्री कौपिनेश्वर मंदिर व अनेक संस्थांशी त्यांचा निकटचा संबंध होता. ठाण्यातील वामनराव ओक रक्तपेढीच्या उभारणीत त्यांचा सिंहाचा वाटा होता. त्यांच्या पश्चात न्यायमूर्ती अभय ओक, दंततज्ज्ञ डॉ. अजित ही दोन मुले, पत्नी, सुना आणि नातवंडे असा परिवार आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Justice Abhay Oak, father of the father