शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
2
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
3
१ वर्षात ₹१ लाखांचे झाले ₹७४ लाख, कोणता आहे जबरदस्त शेअर ज्याला सातत्यानं लागतंय अपर सर्किट?
4
सूर्यकुमार यादवने पाकिस्तानच्या जखमेवर चोळलं मीठ, सुपर ४ मधील लढतीबाबत म्हणाला...
5
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
6
जीएसटी कपातीचा फायदा थेट जनतेला! खर्चासाठी वाढणार हातातली रोकड; एमएसएमई उद्योगांना बळ मिळणार
7
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
8
पाक-सौदीसोबत आता इतर अरब राष्ट्रेही एकत्र? पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा दावा
9
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
10
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
11
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
12
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
13
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
14
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा
15
आयोग नव्हे, मतदारच राजा !
16
विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च
17
चौथ्या मजल्यावरून पडून चिमुकला वाचला; पण कोंडीत जीव गेला
18
मते चोरी हाेणार नाहीत, याची काळजी घ्या; राज ठाकरे यांच्या सूचना
19
सिडकोच्या कंपनीतील कामगारांचा ४० वर्षे प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; ११ कामगारांना प्रत्येकी १० लाखांचा धनादेश
20
ऑलिम्पिक यजमानपदासाठी अहमदाबाद तयार आहे?

केवळ सात दिवसांत सायकलने गाठले रामेश्वरम, प्रदूषणमुक्तीबाबत जनजागृती

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 14, 2021 07:12 IST

awareness about pollution : दैनंदिन तब्बल २३० किलोमीटरच्या प्रवासात नारायणने प्रदूषणमुक्तीबाबत जनजागृती केली.

- सुनील काकडे 

वाशिम : शांती व एकात्मतेचा संदेश घेऊन यापूर्वी वाशिम ते वाघा बॉर्डर (पंजाब) सायकलवारी पूर्ण करणाऱ्या वाशिम येथील नारायण व्यास या ध्येयवेड्या सायकलपटूने आता १,७०० किलोमीटरचे अंतर कापून अवघ्या ७ दिवसांत रामेश्वरम (तामिळनाडू) गाठले आहे. तेथून १४ फेब्रुवारी रोजी रामसेतू आणि कन्याकुमारीच्या दिशेने तो आगेकूच करणार आहे. दैनंदिन तब्बल २३० किलोमीटरच्या प्रवासात नारायणने प्रदूषणमुक्तीबाबत जनजागृती केली.दूरवरचा प्रवास सायकलने सहज पूर्ण करण्याच्या गुणामुळे नारायण व्यास हे नाव एव्हाना परराज्यातही परिचयाचे झाले आहे. यापूर्वी २०१६ मध्ये नारायणने वाशिम ते लालबाग (मुंबई) हे ६०० किलोमीटरचे अंतर सायकलने पार केले होते. त्यानंतर, ब्रेवेट सायकल स्पर्धांमध्ये सहभागी होऊन २००, ३००, ४०० आणि ६०० किलोमीटरचे अंतर वेळेत पूर्ण करून ‘सुपर राँदिनिअर’ हा सायकलस्वारांसाठी असलेला बहुमान प्राप्त केला. मार्च, २०२० मध्ये लॉकडाऊनपूर्वी त्याने वाशिम ते वाघा बॉर्डर (पंजाब) हे १,८०० किलोमीटरचे अंतर सायकलने अवघ्या १० दिवसांत पूर्ण करण्याचा विक्रम करून दाखविला होता. लॉकडाऊन काळातील अभिनेता सोनू सूद याच्या कार्याने प्रेरित होऊन वाशिम ते कन्याकुमारी हे २,००० किलोमीटरचे अंतर ७ दिवसांत पूर्ण करण्याचा ध्यास नारायणने बाळगला होता. ७ फेब्रुवारीपासून प्रवासाला सुरुवात करण्यात आली.

सायकल प्रवासात ‘बॅकअप व्हॅन’ या प्रवासात नारायणसोबत ‘बॅकअप व्हॅन’ आहे. सौरभ व्यास आणि राजू होळपादे हे सवंगडी नारायणला साथ देत आहेत. यादरम्यान स्वयंपाक करून तिघेही रस्त्यात कुठेही भोजन करतात. झोपण्याचे साहित्य व कपड्यांची सुविधाही आहे. 

वाहनांच्या दिवसागणिक वाढत चाललेल्या संख्येमुळे प्रदूषणवाढ होत आहे. ही बाब लक्षात घेऊन प्रत्येकाने सायकल चालविण्यावर आता विशेष भर देणे आवश्यक आहे. त्याचसाठी मी सायकल चालवून प्रदूषणमुक्तीचा संदेश देत आहे. - नारायण व्यास, सायकलपटू, वाशिम

टॅग्स :washimवाशिमenvironmentपर्यावरण