आता बस्स! ‘
By Admin | Updated: May 8, 2014 12:21 IST2014-05-08T12:21:27+5:302014-05-08T12:21:27+5:30
सीपीआर’प्रश्नी कृती समितीने विचारला जाब

आता बस्स! ‘
कोल्हापूर : छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयाची अखेरची घरघर थांबविण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या सीपीआर बचाव कृती समितीने आज (बुधवार) रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. दशरथ कोठुळे यांच्यासमोर वीस महत्त्वपूर्ण तक्रारी मांडत त्याच्या सोडवणुकीसंदर्भात जाब विचारला. यावेळी समितीने तक्रारीसंदर्भात पुढील गुरुवारपर्यंत (दि.१५) उत्तर न दिल्यास आंदोलन तीव्र करण्याचा इशारा दिला. याचबरोबर सोमवारी (दि.१२) रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्याचा निर्णयही घेण्यात आला. या आंदोलनाचे नेतृत्व कृती समितीतर्फे वसंतराव मुळीक यांनी केले. डॉ. कोठुळे यांनी येत्या गुरुवारपर्यंत याप्रश्नी लेखी उत्तर देण्याचे मान्य केले. यावेळी आज कोणते औषध संपले आहे. त्याचबरोबर किती औषधसाठा रुग्णालयाच्या स्टोअरमध्ये उपलब्ध आहे. याकरिता नागरिकांची सनद म्हणून बोर्ड रुग्णालयाच्या बाहेर तयार करून ठेवावा, अशी मागणी आंदोलकांतर्फे करण्यात आली. त्याप्रमाणे बोर्ड बाहेर लावण्यात येणार आहे. सीपीआरमध्ये रुग्णांच्या जखम स्वच्छ करण्यासाठी येणारे हँडग्लोज, कापूस, हायड्रोजन पॅरॉक्साईड, हे साहित्य काही कंपौंडर ५० रुपये घेऊन बाहेर विकतात. असा आरोप आंदोलकांनी केला. त्यांच्यावर कारवाईचे डॉ. कोठुळे यांनी मान्य केले . यावेळी बबनराव रानगे, प्रा. शहाजी कांबळे, भगवानराव काटे, बी. जी. मांगले, भाऊसाहेब काळे, दिलीप देसाई, धीरज रुकडे, बाबा इंदुलकर, विश्वासराव देशमुख, बाळासाहेब भोसले, चंद्रकांत बराले, संभाजीराव जगदाळे, शिरीष देशपांडे, रूपा वायदंडे, मधुकर जांभळे, मारुती भागोजी, कृष्णात पोवार, अशोक पोवार, बबन सावंत, हिंदुराव पोवार, किशोर घाटगे, श्रीकांत भोसले, चंद्रकांत चव्हाण, बी. के. कांबळे, समीर नदाफ, विलास जाधव, बबलू फाले, अनिल रानगे, विवेक कोरडे, शिवाजीराव हिलगे, अशोक गायकवाड, पद्माकर कापसे, नंदा पाटील, मनोज नरके, महादेव पाटील, चंद्रकांत चव्हाण, महादेव जाधव, कृष्णात पोवार, सुनिता पोवार, सखाराम कामत, संभाजी खराडे, बाळासाहेब बेलेकर, विश्वास तरटे, कुंडलिक कांबळे, राजेंद्र ढाले, राजेंद्र पोवार, तुकाराम कांबळे, काशिनाथ गिरीबुवा, आदी सर्वपक्षीय कार्यकर्ते उपस्थित होते.