‘शीख समुदायाबद्दल विनोद करणा:यांविरुद्ध तक्रार नोंदवा’
By Admin | Updated: July 26, 2014 01:14 IST2014-07-26T01:14:42+5:302014-07-26T01:14:42+5:30
सोशल नेटकवर्किग साईटस्च्या माध्यमातून शीख समुदायाबद्दल विनोदी चित्रे आणि मेसेज पाठविण्याचे प्रकार अलीकडच्या काळात अधिक वाढले आहेत.

‘शीख समुदायाबद्दल विनोद करणा:यांविरुद्ध तक्रार नोंदवा’
नागपूर : सोशल नेटकवर्किग साईटस्च्या माध्यमातून शीख समुदायाबद्दल विनोदी चित्रे आणि मेसेज पाठविण्याचे प्रकार अलीकडच्या काळात अधिक वाढले आहेत. यातून शीख समुदायाच्या धार्मिक आणि सामाजिक भावना सातत्याने दुखावल्या जातात. शिखांबद्दल विनोद करणा:या आणि सोशल नेटवर्किग साईट्सच्या माध्यमातून याचा प्रसार करणा:यांविरुद्ध संबंधित पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविण्यात यावी, अशा सूचना नागपूर गुन्हे शाखेचे सहायक पोलीस आयुक्त नीलेश राऊत यांनी नागपूर शीख संगतचे संयोजक बलबीरसिंह रेणु यांना केल्या आहेत.
सोशल नेटवर्किग साईट्सच्या माध्यमातून शीख समुदायाबद्दल विनोदी जोक्स् पसरविणा:यांविरोधी ठोस कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करणारे निवेदन बलबीरसिंह रेणु यांच्या नेतृत्त्वातील शिष्टमंडळाने गत महिन्यात नागपूरचे पोलीस आयुक्त के. के. पाठक यांना दिले होते. रेणु यांच्याशी चर्चा करताना शिखांच्या धार्मिक भावना जपण्याचे आश्वासन पाठक यांनी शिष्टमंडळाला दिले होते. यावर सहायक पोलीस आयुक्त राऊत यांनी, अशा व्यक्तीविरुद्ध तक्रार नोंदविण्यात यावी, अशा सूचना बलबीरसिंह रेणु यांना एका पत्रद्वारे केल्या आहेत.
धर्म विनोदाचा विषय नाही
धर्म हा विनोदाचा विषय नाही. प्रत्येक धर्माला आस्था आणि श्रद्धा आहे. शीख असो वा कोणताही समुदाय यांच्याविरुद्ध सोशल नेटवर्किग साईट्सच्या माध्यमातून विनोदी चित्रे वा मेसेजचा प्रसार करणा:यांनी हा प्रकार थांबवावा. सामाजिक आणि धार्मिक भावना दुखावतील, असे कृत्य कोणीही करू नये.
- बलबीरसिंह रेणु, संयोजक, नागपूर शीख संगत