अंनिस हेल्पलाइनकडे जातपंचायतींच्या तक्रारी
By Admin | Updated: March 14, 2015 05:07 IST2015-03-14T05:07:25+5:302015-03-14T05:07:25+5:30
अंधश्रद्धा निर्मूलनासाठी केलेल्या कायद्यासह अशा प्रकरणांमधील पीडितांना न्याय मिळवून देण्यासाठी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने सुरू केलेल्या

अंनिस हेल्पलाइनकडे जातपंचायतींच्या तक्रारी
औरंगाबाद : अंधश्रद्धा निर्मूलनासाठी केलेल्या कायद्यासह अशा प्रकरणांमधील पीडितांना न्याय मिळवून देण्यासाठी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने सुरू केलेल्या हेल्पलाइनकडे पाच महिन्यांत २०० हून अधिक तक्रारी दाखल झाल्या आहेत. यातील १५० तक्रारी या जातपंचायतीने केलेल्या अमानुष छळासंदर्भात असल्याचे हेल्पलाइन समन्वयक भगवान रणदिवे यांनी ‘लोकमत’ला सांगितले.
अनिष्ट-प्रथा रुढींचे निर्मूलन करत विवेकी-विज्ञाननिष्ठ समाज घडवण्यासाठी २० डिसेंबर २०१३ रोजी अंधश्रद्धा निर्मूलनाचा कायदा अस्तित्वात आला. या कायद्यांतर्गत १२० हून अधिक गुन्हे राज्यभरात दाखल झाले. मात्र नागरिकांना अत्याचार वा फसवणुकीबाबत थेट तक्रार करता यावी, यासाठी सप्टेंबरमध्ये अंनिसने ७५८८८०६६८८ क्रमांकाची हेल्पलाइन सुरू केली. समितीच्या ह्यजातपंचायत मूठमातीह्ण अभियानाचे कार्यवाह कृष्णा चांदगुडे म्हणाले की जातपंचायतीचा प्रश्न केवळ भटक्या-विमुक्तांचाच आहे असा अनेकांचा समज होता.
मात्र आता जैन, मुस्लिम समाजातील व्यक्तींकडूनही या तक्रारी येतात. आपली न्यायालयीन प्रक्रिया कीचकट व वेळखाऊ असल्याने लोकांना जातपंचायतीचा पर्याय अधिक सोपा वाटतो व पुढे ते
त्यात गुरफटत जातात, असेही ते म्हणाले