‘सनबर्न’मध्ये तरुणाई थिरकली!
By Admin | Updated: January 16, 2017 06:36 IST2017-01-16T06:36:15+5:302017-01-16T06:36:15+5:30
परवानगीचे अडथळे पार करत अखेरीस रविवारी ‘मॅरेथॉन’ आणि ‘सनबर्न’ म्युझिक कॉन्सर्ट दिमाखात पार पडली.

‘सनबर्न’मध्ये तरुणाई थिरकली!
मुंबई : परवानगीचे अडथळे पार करत अखेरीस रविवारी ‘मॅरेथॉन’ आणि ‘सनबर्न’ म्युझिक कॉन्सर्ट दिमाखात पार पडली. रविवारच्या दिवशी भर दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास तरुणाईने फ्रेंच डीजे डेव्हिड गेटा यांच्या संगीतावर ताल धरण्यासाठी वांद्रे कुर्ला संकुलात एकच गर्दी केली.
या प्रसंगी, ग्रॅमी पुरस्कार विजेता फ्रेंच डीजे डेव्हिड गेटा याने ‘हे ममा’, डोन्ट वरी चाइल्ड’, ‘विदाउट यू’ ही प्रसिद्ध गाणी गायली.
जवळपास दोन हजारांहून अधिक चाहत्यांनी कॉन्सर्टला हजेरी लावून पाश्चिमात्य संगीताचा आनंद लुटला. डीजे डेव्हिडच्या चाहत्यांनी त्याला शुभेच्छा देणारे बॅनर्स झळकवित संगीतावर ताल धरला, तर बहुतांश चाहत्यांनी डीजे डेव्हिडचे नाव लिहिलेले टी-शर्ट्स परिधान केलेले दिसून आले. या म्युझिक कॉन्सर्टमध्ये डेव्हिडने जवळपास ९० मिनिटे एकामागोमाग एक गाणे गाऊन मुंबईकरांचे मन जिंकले. यापूर्वी डेव्हिडने बंगळूर येथे परफॉर्मन्स सादर केला. यानंतर, रविवारी रात्री दिल्लीकरांनी डेव्हिडच्या धुंद करणाऱ्या संगीताची जादू अनुभवली. (प्रतिनिधी)
> भारताचे खूप आभार या शब्दांत फ्रेंच डिजे डेव्हिड गेटाने प्रेक्षकांप्रती कृतज्ञता व्यक्त केली, तसेच ‘आय लव्ह यू इंडिया’ असे म्हणत प्रेक्षकांचा निरोप घेतला.