कल्याणमध्ये ज्युनिअर केजीतील विद्यार्थ्याचा मृत्यू

By Admin | Updated: July 1, 2014 17:46 IST2014-07-01T17:44:41+5:302014-07-01T17:46:02+5:30

आंबिवली येथे सेंच्युरी स्कूलमध्ये ज्युनिअर केजीत शिकणा-या एका लहान मुलाचा मृत्यू झाला आहे

Junior KG student dies in Kalyan | कल्याणमध्ये ज्युनिअर केजीतील विद्यार्थ्याचा मृत्यू

कल्याणमध्ये ज्युनिअर केजीतील विद्यार्थ्याचा मृत्यू

>ऑनलाइन टीम
कल्याण, दि. १ - कल्याणजवळील आंबिवली येथे सेंच्युरी स्कूलमध्ये ज्युनिअर केजीत शिकणा-या एका लहान मुलाचा मृत्यू झाला आहे. अर्जुनसिंह जिन्हा (वय ५) असे त्या दुर्दैवी मुलाचे नाव असून उलट्या होऊन त्याचा मृत्यू झाला.  शाळेच्या हलगर्जीपणामुळे मुलाचा मृत्यू झाल्याचा आरोप त्याच्या पालकांनी केला आहे.
आज सकाळी नेहमीप्रमाणे अर्जुनसिंह शाळेत गेला. सकाळी दहाच्या सुमारास त्याने त्याचा डबा खाल्ला, मात्र काही वेळाने त्याला उलट्या होऊ लागल्या. शिक्षकांनी त्याला एका बाकावर झोपवले व त्याच्या पालकांना फोन करून बोलावले. शाळेत आल्यावर त्याच्या पालकांनी त्याला रुग्णालयात नेले, मात्र तेथे त्याला मृत घोषित करण्यात आले. या प्रकरणी अर्जुनसिंहच्या नातवेईकांनी शाळा प्रशासन व शिक्षकांना दोषी ठरवले आहे. अर्जुनला वेळीच रुग्णालयात दाखल करण्यात आले असते तर आमच्या मुलाच जीव वाचला असता असे सांगत नातेवाईकांनी शाळेच्या हलगर्जीपणामुळे मृत्यू झाल्याचा आरोप करत शाळेत तोडफोड केली असून मुख्याध्यापकांनाही मारहाण केली आहे.
दरम्यान अर्जुनसिंहचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला असून त्यानंतरच त्याच्या मृत्यूचे नेमके कारण समजू शकले. याप्रकरणी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

Web Title: Junior KG student dies in Kalyan