आईची दोन मुलींसह विहिरीत उडी

By Admin | Updated: October 10, 2015 01:35 IST2015-10-10T01:35:25+5:302015-10-10T01:35:25+5:30

घरगुती वादातून संतापाच्या भरात एका आईने आपल्या दोन्ही मुलींसह विहिरीत उडी घेतली. यात दोन्ही बालिकांचा बुडून मृत्यू झाला, तर आई बचावली आहे.

The jump in the well with two mother's daughters | आईची दोन मुलींसह विहिरीत उडी

आईची दोन मुलींसह विहिरीत उडी

पिंपळनेर, जि. धुळे : घरगुती वादातून संतापाच्या भरात एका आईने आपल्या दोन्ही मुलींसह विहिरीत उडी घेतली. यात दोन्ही बालिकांचा बुडून मृत्यू झाला, तर आई बचावली आहे. चिकसे येथे शुक्रवारी सकाळी ही घटना घडली. या प्रकरणी पोलिसांनी महिलेच्या पतीस चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.
अरुणा नरेंद्र खैरनार (३४) असे या मातेचे नाव आहे, तर चेतना (५) व कोमल (३) असे मृत्युमुखी पडलेल्या बालिकांची नावे आहेत. या दोन्ही मुलींसह अरुणाने गावापासून जवळच असलेल्या विहिरीत उडी घेतली. काही शेतकरी व ग्रामस्थांच्या हे लक्षात येताच, त्यांनी या सर्वांना वाचविण्याचे प्रयत्न केले. तिघांना तातडीने पिंपळनेर ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी चेतना व कोमल या दोघींना मृत घोषित केले.
या प्रकरणी येथील पोलिसांत अकस्मात मृत्यूंची नोंद करण्यात आली आहे. मात्र, अरुणाचे वडील नारायण सुकलाल माळी यांनी एका अर्जाद्वारे पोलिसांकडे घातपात झाल्याचा संशय व्यक्त केला आहे.

Web Title: The jump in the well with two mother's daughters