शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी एकाकी, कुणी ऐकत नाही, LPG मुद्द्यावर पक्षातच उभी फूट; नेते करतायत मोदींचे कौतुक
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
5
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात लागला बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
6
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
7
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
8
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
9
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
10
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
11
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
12
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
13
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
14
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
15
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
16
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
17
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
18
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
19
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
20
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

भीमा-कोरेगाव घटनेची न्यायालयीन चौकशी होणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2018 14:32 IST

या घटनेची उच्च न्यायालयाच्या विद्यमान न्यायाधीशांकडून चौकशी होणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. याचबरोबर, सोशल मीडियातून अफवा पसरवणाऱ्यांवर कारवाई करण्यात येणार असून या घटनेतील मृताच्या नातेवाईकांना दहा लाख रुपयांची मदत राज्य सरकारकडून केली जाणार असल्याची माहितीही देवेंद्र फडणवीस यांनी दिली. 

ठळक मुद्देया घटनेची उच्च न्यायालयाच्या विद्यमान न्यायाधीशांकडून चौकशी होणार सोशल मीडियातून अफवा पसरवणाऱ्यांवर कारवाई करण्यात येणारभीमा-कोरेगाव घटनेला कोणताच रंग देऊ नये - शरद पवार 

मुंबई : नगर महामार्गावरील भीमा-कोरेगावमध्ये सोमवारी (ता.1 जानेवारी) किरकोळ वादातून दोन गटात वाद निर्माण झाला. या वादाचे पर्यवसान हाणामारी, गाड्यांची तोडफोड, जाळपोळ आणि दगडफेकीत झाले. यात एका युवकाचा मृत्यू झाला असून ठिकठिकाणी पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. दरम्यान, या घटनेची उच्च न्यायालयाच्या विद्यमान न्यायाधीशांकडून चौकशी होणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. याचबरोबर, सोशल मीडियातून अफवा पसरवणाऱ्यांवर कारवाई करण्यात येणार असून या घटनेतील मृताच्या नातेवाईकांना दहा लाख रुपयांची मदत राज्य सरकारकडून केली जाणार असल्याची माहितीही देवेंद्र फडणवीस यांनी दिली. 

भीमा-कोरेगाव येथील ऐतिहासिक लढाईला  200 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त याठिकाणी राज्यभरातून साडे-तीन लाख लोक आले होते.  याठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. मात्र, दोन समाजात तेढ निर्माण करुन हिंसाचार करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळे नागरिकांनी याकडे दुर्लक्ष करुन शांतता राखावी असे आवाहन देवेंद्र फडणवीस यांनी केले. तसेच, या घटनेची उच्च न्यायालयाच्या विद्यमान न्यायाधीशांकडून चौकशी होणार आहे. या घटनेत ज्या युवकाचा मृत्यू झाला. त्याची हत्या समजून सीआयडीमार्फत चौकशी केली जाणार आहे. याचबरोबर, मृताच्या नातेवाईकांना दहा लाख रुपयांची मदत राज्य सरकारकडून केली जाणार आहे. राज्यभरात ज्याठिकाणी हिंसाचाराच्या घटना घडल्या, त्याठिकाणी पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणली आहे. तसेच, अनेक ठिकाणी पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून पसरवणाऱ्यांवर कारवाई करु, असेही यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. 

भीमा-कोरेगाव घटनेला कोणताच रंग देऊ नये - शरद पवार भीमा-कोरेगाव प्रकरणावर आयोजित पत्रकार परिषदेमध्ये  राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आपली भूमिका मांडली. यावेळी समाजाच्या सर्व स्तरातील लोकांना शांतता बाळगण्याचे आवाहन शरद पवार यांनी केले. जे घडलं त्याची चौकशी राज्य सरकारने करावी. जे सार्वजनिक क्षेत्रात काम करतात त्यांनी हे पसरु न देण्याची भूमिका घ्यावी. घडलेला प्रकार शोभादायक नाही. यावर पूर्णविराम कसा पडेल. राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील लोकांनी यात तेल न टाकता कोणतेही भाष्य करु नये, किंवा चर्चा करु नये. जे काही करायचे असेल ते सामंज्यस्याने करावे, असे आवाहन शरद पवार यांनी केले आहे.

टॅग्स :Bhima-koregaonभीमा-कोरेगावDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस