शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: 'नीच' पाकिस्तानचे भारतीय नागरिकांवर ड्रोन हल्ले; फिरोजपूरमध्ये संपूर्ण कुटुंब जखमी
2
India Pakistan Tension: जम्मू, सांबा, पठाणकोट विभागात दिसले पाकिस्तानी ड्रोन, जम्मू, उधमपूरमध्ये ब्लॅकआऊट 
3
गरज पडली तर युद्धात मदरशातील मुलांचा वापर करू, पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचे हास्यास्पद विधान
4
भारत-पाकिस्तान यांच्यातील तणावामुळं दादर चौपाटी पर्यटकांसाठी बंद? मुंबई पोलिसांची महत्त्वाची पोस्ट
5
धोनी, तेंडुलकरही पाकिस्तानविरूद्ध युद्धभूमीत दिसणार? तणावादरम्यान भारत सरकारचा मोठा निर्णय
6
युद्धसदृश परिस्थिती, आयपीएलला स्थगिती, जय हिंद म्हणत विराट कोहलीने व्यक्त केल्या भावना
7
Mumbai: ६३ टक्क्यांहून अधिक मुंबईकर सहा तासांपेक्षा कमी झोपतात, कारण तर ऐका!
8
निशस्त्र ड्रोन पाठवण्यामागे पाकिस्तानचा होता मोठा कट, परराष्ट्र मंत्रालयाने दिली धक्कादायक माहिती
9
"भारतीय सैन्याचा जोश... High! पाकिस्तानला तोडीस तोड उत्तर मिळेल"; उरी भेटीनंतर LGचे विधान
10
India Pakistan Tensions: बिथरलेल्या पाकिस्तानकडून नागरी विमानांचा ढाल म्हणून वापर, परराष्ट्र मंत्रालयाची माहिती
11
"धार्मिक स्थळांवर हल्ले...दुटप्पीपणा...त्यांनी खालची पातळी गाठली"; परराष्ट्र सचिवांनी वाचला पाकिस्तानच्या कुकर्मांचा पाढा
12
तुर्कीत निर्मिती झालेल्या ३०० ते ४०० ड्रोनद्वारे पाकिस्तानचा भारतातील ३६ ठिकाणी हल्ला, कर्नल सोफिया कुरेशी यांनी दिली माहिती 
13
"पाकिस्तानला अक्कल असेल तर बंदुका शांत ठेवाव्यात, नाहीतर..."; CM ओमर अब्दुल्ला यांचा थेट इशारा
14
बीकेसी ते वरळी फक्त १५ मिनिटांत! मेट्रो-३ चा दुसरा टप्पा सुरु, CM फडणवीसांच्या हस्ते उदघाटन
15
समसप्तक नीचभंग राजयोग: ९ राशींना सुवर्ण काळ, अडकलेले पैसे मिळतील; शेअर बाजारात नफा, शुभ-लाभ!
16
Mumbai: भारत- पाकिस्तान युद्धात घाटकोपरमधील जवान शहीद
17
गस्त वाढवा, ‘त्या’ हँडल्सवर लक्ष ठेवा, वरिष्ठांच्या सुट्या रद्द; CM फडणवीसांकडून महत्त्वाचे निर्देश
18
पाकिस्तानला आणखी एक धक्का; सिंधू कराराबाबत जागतिक बँकेने घेतली भारताची बाजू...
19
“उद्धव ठाकरे सत्तेत कमी विरोधी पक्षात जास्त राहिले, कारखाने वाचवण्यासाठी सत्ता नको”: राऊत
20
मत्स्यव्यवसाय क्षेत्राला कृषी दर्जा देण्याचा शासन निर्णय जारी; आजपासून होणार अंमलबजावणी

‘जज ने सीरिअसली ले लिया’

By admin | Updated: May 7, 2015 05:44 IST

सलमानच्या ‘हिट अ‍ॅण्ड रन’च्या अंतिम निर्णय सोशल मिडियावरही चांगलाच रंगला. बुधवारी सकाळपासून फेसबुक, टष्ट्वीटर आणि व्हॉट्सअपवर सलमानचीच चर्चा होती.

हिट अ‍ॅण्ड रन खटला : सोशल मीडियावर ‘सलमान एके सलमान’मुंबई : सलमानच्या ‘हिट अ‍ॅण्ड रन’च्या अंतिम निर्णय सोशल मिडियावरही चांगलाच रंगला. बुधवारी सकाळपासून फेसबुक, टष्ट्वीटर आणि व्हॉट्सअपवर सलमानचीच चर्चा होती. यातही ‘मुझ पे एक एहसान करना के मुझपे कोई एहसान मत करना...’ या सलमानच्या प्रसिद्ध डायलॉगला ‘जज ने सीरिअसली ले लिया..’ हे वाक्य जोडून तयार केलेल्या मेसेजने व्हॉट्सअपवर एकच धम्माल उडली. सोशल मिडियावर सलमानचे एकापेक्षा एक भन्नाट फोटोस् एडिट करुन त्याचे जोरदार शेअरिंग झाले. शिवाय, ‘आज के बाद सलमान खान कभी नही बोलेगा के... आज कुछ तूफानी करते है’ यावरही व्हॉट्सअपवर एकच हशा पिकला. तर ब्रेकींग न्यूज म्हणत ‘माधुरी दीक्षित के दोनों साजन जेल मे’ या वन लायनरने संजय दत्त व त्यामागोमाग आता सलमानवर टिप्पणी करत व्हॉट्सअपकरांनी ‘सल्लूभाई’ला टार्गेट केले. त्यानंतर दुपारनंतर व्हॉट्सअपवर पाठोपाठ सलमान, हिट अ‍ॅण्ड रन खटला, अफेअर्सवर जोक्सचे शेअरिंग होऊ लागले. (प्रतिनिधी)सर, प्लीज फॉरगिव्ह सलमान भाई !मुंबई : सलमानच्या ‘हिट अ‍ॅण्ड रन’ खटल्याच्या अंतिम निर्णयाचा दिवस उजाडताच सकाळपासून टष्ट्वीटरवर याविषयीचे वेगवेगळे ट्रेंड्स दिसून आले. त्यात ‘#व्हीलव्हयूस लमानखान’,‘#बिइंगसलमानखान’,‘#सलमानवर्डिक्ट’, ‘#सलमान गिल्टी’ , ‘#सलमान जजमेंट डे’ आणि ‘#व्हीलव्हयूसलमान बट व्ही लव्ह जस्टीस मोअर’ अशा ट्रेंड्समध्ये भर पडत गेली.सलमान खानच्या प्रेमापोटी त्याच्या चाहत्यांनी ज्याप्रमाणे त्याच्या घराबाहेर गर्दी केली. त्याचप्रमाणे, बुधवारी सकाळपासूनच टष्ट्वीटरवर सलमानच्या चाहत्यांनी त्याला सपोर्ट करणारे, दु:ख व्यक्त करणारे टष्ट्वीट्स केले. त्यात काही चाहत्यांनी ‘तू जेलमध्ये सेफ राहा’ असे टष्ट्वीट केले तर काही चाहत्यांनी ‘सर प्लीज फॉरगिव्ह सलमान भाई.. अ‍ॅण्ड पनिश्ड मी’ असे म्हणत थेट न्यायाधीशांना टष्ट्वीटरवरुन साद घालण्याचा प्रयत्न केला. शिवाय, सलमानच्या गर्ल्स फॅन्सने तर त्याचे वेगवेगळ््या चित्रपटांतील फोटो्स अपलोड करीत ‘आम्ही तुझ्यासोबत आहोत’ असा मेसेज टष्ट्वीट केला. काही चाहत्यांनी सलमान खानचे काही फोटो एडीट करुन जेलमध्ये गेल्यास सलमानला काळजी घेण्याचे सल्लेही दिले. तर ‘चुका सर्वांकडून होतात, त्यामुळे सलमानला माफ करा’ या आशयाचे टष्ट्वीट करत काही चाहत्यांनी न्यायालयाला विनंतीही केली. सुनावणी जसजशी टप्याटप्प्याने होत गेली, त्याप्रमाणे टष्ट्वीटरवरच्या ट्रेंड्समध्ये वेगळेपणं दिसून आले. (प्रतिनिधी)व्हॉट्सअ‍ॅपवर शेअरिंग जोरातव्हॉट्सअपवर अभिनेत्री ऐश्वर्या राय-बच्चन हिचा आराध्यला सोबतच्या एका फोटोचे शेअरिंग झाले. त्यावर ‘चल..मामाला जेवण घेऊन जायचयं जेलमध्ये’ असा मेसेज लिहिला होता. यावर फोटोवर व्हॉट्सअपवर स्माईलीज्चा पाऊस पडला, तर पुन्हा एकदा ऐश्वर्या-सलमानच्या नात्याचीही आठवण करुन दिली. याप्रमाणे, संजय दत्तसोबत सलमान अशा एका फोटोवर ‘येरवडामधील एक क्षण...चल मेरे भाई’ असा मेसेज लिहिला होता. या फोटोनेही व्हॉट्सअपकरांना हसू फुटले. सलमानच्या काही फॅन्सने तर तुरुंगातील कैद्यांच्या युनिफॉर्मचा फोटो एडिट करुन त्यावर ‘बिइंग ह्युमन’ असे लिहित सलमान जेलमध्ये सुरक्षित रहा असा फोटो शेअर केला. त्यामुळे या ना त्या कारणाने बुधवारी उशिरापर्यंत व्हॉट्सअपवर ‘सल्लू भाई’ची चर्चा रंगली होती. ‘हिट अ‍ॅण्ड रन’साठी खास संकेतस्थळ !सेलिब्रिटी आणि कोर्ट हे समीकरण सामान्यांना नवे नाही. मात्र प्रसारमाध्यमे नेमकी माहिती देण्याऐवजी ती रंगवितात. या गडबडीत ध चा मा होतो, अशी ओरड सेलीब्रेटींकडून होते. त्यामुळेच बॉलिवूडच्या ‘मि. दबंग’ने स्वत:विरोधातल्या खटल्यांची अचूक माहिती उपलब्ध करून देण्यासाठी खास संकेतस्थळाची निर्मिती केली होती. हिट अँड रन प्रकरणासोबतच जोधपूर येथील काळवीट शिकार प्रकरणाची देखील केस सुरु आहे. हिट अँड रन प्रकरणावर न्यायालयातील सुनावणीच्या बातम्या ‘सलमान खान फाईल्स डॉट कॉम’ या संकेतस्थळावर अपडेट सलमानचे वकील करतात. बुधवारी दिवसभरात घडलेल्या घडामोडी मात्र या साईटवर अपडेट केलेल्या नव्हत्या.