शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

न्यायाधीश, वकिलांनी लावला डोक्याला हात; ज्यावेळी व्हिडिओ कॉन्फरन्सच्या सुनावणीला अर्जदार ‘अशा ’अवस्थेत बसला..

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 25, 2020 15:27 IST

अचानक ते 'त्या' अवस्थेत कॅमेरा समोर आल्याने मोठा गोधळ उडाला... 

ठळक मुद्देजयपूरच्या न्यायालयात सुरू होती व्हिडीओ कॉन्फरसद्वारे सुनावणी

पुणे : कोरोनाच्या भीतीने न्यायालयाने महत्वाच्या सुनावणी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे घेण्याच्या सूचना केल्या आहेत. मात्र यावरून अनेकदा गंमतीदार प्रसंग घडताना दिसत आहेत. जयपूर येथील एका न्यायालयात व्हिडिओ कॉन्फरन्स सुरू असताना अर्जदार हा चक्क ‘त्या’अवस्थेत सामोरा गेला असल्याची घटना घडली आहे. विशेष म्हणजे हा अर्जदार वकिलच असल्याने न्यायाधीश आणि सरकारी वकील यांनी डोक्याला हात लावला.    वाढता कोरोनाचा संसर्ग यामुळे न्यायालय प्रशासनाकडून काळजी घेण्यात आली आहे.न्यायालयाच्या आवारात गर्दी न करणे, केवळ महत्त्वाचे प्रकरण हाताळणे, आणि गंभीर गुन्ह्यातील आरोपीना सुनावणी च्या वेळी न्यायालयात न आणता व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे प्रकरण सुरू ठेवणे अशा सूचना देण्यात आल्या आहेत. अशीच एक सुनावणी जयपूरच्या संजीव प्रकाश शर्मा यांच्या न्यायालयात सुरू होती. त्यावेळी रवींद्र कुमार पालिवाल यांच्या प्रकरणाची सुनावणी व्हिडीओ कॉन्फरसद्वारे सुरू होती. त्यावेळी ते अचानक बनियन मध्ये कॅमेरा समोर आल्याने मोठा गोधळ उडाला.   यावर न्यायालयाने वकिलांनी यापूर्वी देण्यात आलेल्या सूचनांचे पालन करून व्हिडीओ कॉन्फरन्सला सामोरे जावे. तसेच आपला गणवेश परिधान करून कॅमेरा समोर यावे. असे सांगून त्या सुनावणीला पुढील तारीख दिली.

* सध्याची परिस्थिती अशी आहे की यावेळी कुठलिही गोष्ट सहजपणे उपलब्ध होत नाही. संबंधित वकिलाला काही तांत्रिक अडचण असावी मात्र अचानक झालेल्या घाई गडबडीत त्याच्याकडून ती चूक झाली. न्यायालयाने दिलेल्या सूचनांचे पालन केले पाहिजे. ज्या विशिष्ट शिस्तीत न्यायालयाचे कामकाज चालते त्याचा भंग होणार नाही याची काळजी घ्यायला हवी. कोरोणामुळे सर्वजण घरात बसून आहेत. आॅफिस बंद आहे. बाहेर पडायला परवानगी नाही. वाहतूक बंद अशावेळी सूट, टाय, कोट, या जर कार्यालयात विसरले असेल तर ऐनवेळी समस्येला सामोरे जावे लागत आहे. - अ‍ॅड. दीपक शामगिरे 

* कुठल्याही परिस्थितीत न्यायालयाचा अवमान होता कामा नये. त्या वकिलाने किमान शर्ट परिधान करणे गरजेचे होते. मात्र तसे झाले नाही. काही तांत्रिक अडचण असेल न्यायालयाच्या सूचना पाळल्या जाव्यात. घरातून व्हिडीओ कॉन्फरन्सिंग करताना घरात कोट नसणे हे जरी मान्य केले तरी पांढरा शर्ट अशावेळी वापरणे महत्वाचे आहे. न्यायाधीश त्यांचा कर्मचारी वर्ग हा आपल्याला पाहत असतो. तेव्हा या प्रकरणात न्यायालयाने दिलेला निकाल योग्यच आहे. - अ‍ॅड. मिलिंद पवार (माजी अध्यक्ष, पुणे बार असोसिएशन

टॅग्स :PuneपुणेCourtन्यायालयadvocateवकिल