निवडणूक जिंकल्याचा आनंद अन् मातृछत्र हरपल्याचे दु:ख
By Admin | Updated: February 23, 2017 18:18 IST2017-02-23T18:14:04+5:302017-02-23T18:18:32+5:30
कॉँग्रेसच्या उमेदवार डॉ. हेमलता पाटील या महापालिकेच्या निवडणूकीत यशस्वी झाल्या.

निवडणूक जिंकल्याचा आनंद अन् मातृछत्र हरपल्याचे दु:ख
नाशिक : कॉँग्रेसच्या उमेदवार डॉ. हेमलता पाटील या महापालिकेच्या निवडणूकीत यशस्वी झाल्या. मतमोजणीची प्रक्रिया पार पडत असताना जनमताचा कौल पाटील यांच्या बाजूने लागला. यशाचा आनंदोत्सव साजरा करण्याची वेळ आली असतानाच नियतीने मात्र त्यांचे मातृछत्र हिरावून घेतले. त्यामुळे पाटील यांच्यावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.
पाटील यांनी ‘फेसबुक’वरून पुढील शब्दांत आपली प्रतिक्रीया नोंदविली आहे.
‘‘माझ्या निवडणूकी मध्ये मतदानाच्या दिवसापर्यंत आपले प्राण थोपवून धरणारी माझी आई आज निकाला च्या दिवशी मात्र कुडीत थोपवून धरलेल्या प्राणाला थांबवू शकली नाही आणि मृत्यूला अखेर शरण गेली. मला आता समझतच नाही माझ्या या निवडणूकीतील यशाचे स्वागत तरी कसं करू?’’