दिव्यांगांना बेस्टचा प्रवास मोफत

By Admin | Updated: October 20, 2016 02:00 IST2016-10-20T02:00:16+5:302016-10-20T02:00:16+5:30

दिव्यांग व्यक्तींना (दृष्टीहीन आणि ४० टक्के व त्यापेक्षा अधिक अस्थिव्यंग अपंग) वातानुकूलित सेवा वगळता बेस्ट बसमधून गुरुवारपासून मोफत प्रवास करता येणार

Journey to the best of the angels is free | दिव्यांगांना बेस्टचा प्रवास मोफत

दिव्यांगांना बेस्टचा प्रवास मोफत


मुंबई : दिव्यांग व्यक्तींना (दृष्टीहीन आणि ४० टक्के व त्यापेक्षा अधिक अस्थिव्यंग अपंग) वातानुकूलित सेवा वगळता बेस्ट बसमधून गुरुवारपासून मोफत प्रवास करता येणार आहे. २० आॅक्टोबर रोजी या योजनेची औपचारिक घोषणा करण्यात येणार असून, ही सवलत बेस्टसेवा
कार्यान्वित असलेल्या महापालिका परिसरासह लगतच्या शहरांमध्ये उपलब्ध आहे.
सवलतीच्या लाभार्थ्यांना बेस्टचे स्मार्टकार्ड/ओळखपत्र प्रवासावेळी सोबत बाळगणे बंधनकारक असणार आहे. सवलतीचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्यांनी बेस्टने विनाशुल्क उपलब्ध केलेले मुद्रित प्रपत्र आवश्यक माहिती प्रमाणपत्राच्या छायांकित प्रतीसह संबंधित प्रशासकीय अधिकाऱ्याकडे रविवार, सार्वजनिक सुट्टीव्यतिरिक्त कार्यालयीन वेळेत सादर करावे.
अधिकाऱ्याकडून कागदपत्रांची पडताळणी झाल्यावर दिव्यांगांना बसपास वितरण केंद्रावर नोंदणीसह छायाचित्र काढण्याकरिता पाठविले जाईल. लाभार्थी प्रवाशांना स्मार्टकार्ड/ओळखपत्रासाठीचे शुल्क ४० रुपये भरावे लागतील. नोंदणीनंतर सात दिवसांत स्मार्टकार्ड संबंधित वितरण केंद्रात उपलब्ध होईल, अशी माहिती बेस्टकडून देण्यात आली. (प्रतिनिधी)

Web Title: Journey to the best of the angels is free