पत्रकार सुधीर सूर्यवंशींवर हल्ला, हॉकी स्टिकने बेदम मारहाण

By Admin | Updated: March 31, 2017 17:19 IST2017-03-31T17:06:55+5:302017-03-31T17:19:12+5:30

पत्रकार सुधीर सूर्यवंशींवर शुक्रवारी दुपारी भररस्त्यात हल्ला करुन त्यांना बेदम मारहाण करण्यात आली.

Journalist Sudhir Suryavanshi attacked, hockey sticks breathlessly beaten | पत्रकार सुधीर सूर्यवंशींवर हल्ला, हॉकी स्टिकने बेदम मारहाण

पत्रकार सुधीर सूर्यवंशींवर हल्ला, हॉकी स्टिकने बेदम मारहाण

 ऑनलाइन लोकमत 

ठाणे, दि. 31 - पत्रकार सुधीर सूर्यवंशींवर शुक्रवारी दुपारी भररस्त्यात हल्ला करुन त्यांना बेदम मारहाण करण्यात आली. खारघरच्या शिल्पी चौकात ही घटना घडली. चौघा अज्ञात आरोपींनी सूर्यवंशींना रस्त्यात गाठले व  हॉकी स्टिकने त्यांना बेदम मारहाण केली. सूर्यवंशी या हल्ल्यात गंभीर जखमी झाले आहेत. अनेक ठिकाणी त्यांना फ्रॅक्चर झाले आहे. 
 
सूर्यवंशींना जवळच्या मेडिसिटी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. खारघर सेक्टर 12 मध्ये चतुर्भुज बिल्डींगजवळ त्यांच्यावर हल्ला झाला. हल्लेखोर तोंडाल रुमाल बांधून आले होते. सुर्यवंशींना मारहाण केल्यानंतर हल्लेखोर तिथून पसार झाला. गंभीर जखमी झालेल्या सुर्यवंशीवर शस्त्रक्रिया करावी लागणार असल्याची माहिती आहे. सुधीर सुर्यवंशी डीएनए या इंग्रजी दैनिकाचे पत्रकार आहेत. 
 
पत्रकारांवर यापूर्वी देखील हल्ले झाले आहेत. सूर्यवंशींच्या मारहाणीचा मुद्दा विधान परिषदेत उपस्थित झाल्यानंतर गृहराज्यमंत्री रणजित पाटील यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करुन दोषींवर कारवाई करणार असल्याची माहिती दिली. काहीवर्षांपूर्वी छोटा राजन टोळीने भाडोत्री गुंडांकरवी इंग्रजी दैनिकाचे पत्रकार जेडे यांची भररस्त्यात गोळया झाडून हत्या केली होती. 

Web Title: Journalist Sudhir Suryavanshi attacked, hockey sticks breathlessly beaten

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.