‘त्या’ पत्रकाराला जिवंत जाळले !

By Admin | Updated: July 13, 2015 01:06 IST2015-07-13T01:06:23+5:302015-07-13T01:06:23+5:30

मध्य प्रदेशातील बालाघाट येथील पत्रकार संदीप कोठारी यांना जिवंत जाळल्याचे धक्कादायक वास्तव शवविच्छेदन अहवालातून पुढे आले आहे. सिंदी (रेल्वे)

'That journalist burnt alive! | ‘त्या’ पत्रकाराला जिवंत जाळले !

‘त्या’ पत्रकाराला जिवंत जाळले !

रूपेश खैरी , वर्धा
मध्य प्रदेशातील बालाघाट येथील पत्रकार संदीप कोठारी यांना जिवंत जाळल्याचे धक्कादायक वास्तव शवविच्छेदन अहवालातून पुढे आले आहे. सिंदी (रेल्वे) पोलीसांच्या हद्दीत जळालेल्या अवस्थेत त्यांचा मृतदेह आढळला होता.
शवविच्छेदन अहवालात त्यांच्या फुफ्फुसात कार्बनचे कण आढळले आहे. संदीप यांचे नाक-तोंड दाबल्याने श्वास गुदमरल्याचाही अहवालात उल्लेख आहे. कटंगी ठाण्याचे (मध्य प्रदेश) पोलीस निरीक्षक संजय चौकसे यांनीही या माहितीस दुजोरा दिला आहे. मात्र अहवालात नाक तोंड दाबल्याचा उल्लेख असल्याने संदीप यांचा मृत्यू नेमका कशाने झाला, असा संभ्रम निर्माण झाला आहे. संदीपच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करणाऱ्या वर्ध्यातील वैद्यकीय अधिकाऱ्यांशी चर्चा करणार असल्याचेही चौकसे यांनी सांगितले. संदीप यांच्या खून प्रकरणात आतापर्यंत सात जणांना अटक झाली आहे. मुख्य आरोपी फरार झाला आहे.

Web Title: 'That journalist burnt alive!