शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळ उडाली! हवाई दलाच्या विमानावर हवेत असतानाच मोठा हल्ला; म्यानमारला मदत नेत असताना...
2
“हल्लेखोर आले, पोलिसांना फोन केला पण...”; मुर्शिदाबाद हिंसाचारातील थरकाप उडवणाऱ्या घटना
3
डोनाल्ड ट्रम्प यांच्या हत्येचा कट; १७ वर्षीय तरुणानं आधी आई वडिलांना संपवलं, मग...
4
Chandra Gochar 2025: राहूच्या नक्षत्रात चंद्राचे संक्रमण; पाच राशींच्या आयुष्याला देईल सुखाचे वळण!
5
ओयोचे मालक रितेश अग्रवाल यांच्यावर गुन्हा दाखल; रूम बुकिंगच्या नावाखाली फसवणूक केल्याचा आरोप
6
VIDEO: 'रोहित शर्माला Mumbai Indiansचं कॅप्टन करा', चाहत्याच्या मागणीवर नीता अंबानी म्हणाल्या...
7
नाशकात आंबेडकर जयंतीच्या मिरवणुकीत डीजेवर नाचताना तरुणाचा दुर्दैवी मृत्यू, नेमकं काय घडलं?
8
माजी सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या मुलींसाठी योग्य घर मिळेना; म्हणाले, ‘समाज दिव्यांगांना दडपून टाकतो’ 
9
अरबी समुद्रात सापडला १८०० कोटी रुपयांचा ड्रग्स साठा; गुजरात ATS अन् कोस्ट गार्डला मोठं यश
10
"बॉम्बने त्याची गाडी उडवून देऊ", सलमान खानला पुन्हा जीवे मारण्याची धमकी
11
"महात्मा गांधींच्या हत्येमध्ये सावरकरांचा काही संबंध नाही", रणदीप हुड्डाचं स्पष्ट मत, म्हणाला-
12
"अजूनही मला त्याची उब जाणवते..", 'अशी ही बनवाबनवी' फेम शंतनूच्या आठवणीत बायकोनं केलं टक्कल
13
कवठेमहांकाळ तालुक्यातील कुचीजवळ भीषण अपघात; एका महिलेचा मृत्यू, ११ जण जखमी
14
Mehul Choksi : मेहुल चोक्सीकडून आतापर्यंत किती वसूल केले? ईडीच्या चौकशीतून धक्कादायक माहिती समोर
15
कार्तिकी गायकवाडने 'नीज बाळा' अंगाई रिलीज करत दाखवली लेकाची झलक, दिसतो खूपच गोड
16
"पप्पा, प्लीझ मला फोन घेऊन द्या ना..."; आधी सासऱ्याकडे केला हट्ट, नंतर सासूसोबत पळाला जावई
17
अखेर काय आहे ट्रम्प यांचा प्लान? आता यू-टर्न घेत म्हटलं, "कोणीही सूटणार नाही, सर्वच देश निशाण्यावर..."
18
मुलावर वशीकरण करून सासूने पळवून नेले, जाताना...; सासू-जावई लव्ह स्टोरीत नवा ट्विस्ट 
19
अवैध बोअरवेलमधून पाणी घेणे पापापेक्षा कमी नाही, पाण्यासाठी हाहाकार माजेल -उच्च न्यायालय
20
Astro Tips: इच्छापूर्ती वा आर्थिक अडचणीतून सुटकेसाठी चार सोमवार करा 'हे' सोपे उपाय!

मंत्रालयातील सहसचिवानं स्वेच्छानिवृत्तीनंतर हाती घेतली 'मशाल'; विधानसभा निवडणूक लढणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 3, 2024 18:42 IST

आज मातोश्रीवर पक्ष प्रवेश कार्यक्रमात उद्धव ठाकरे यांनी खरात यांच्या हातात शिवबंधन बांधून त्यांना पक्षात प्रवेश दिला.

मुंबई - गेल्या काही वर्षात प्रशासनातून राजकारणात येणाऱ्यांची अनेक उदाहरणे आपल्याला पाहायला मिळतात. त्यातच आणखी एका अधिकाऱ्याची भर पडली आहे. मंत्रालयातील सहसचिव पदावरून स्वेच्छानिवृत्ती घेत अधिकाऱ्याने उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत मातोश्री इथं 'मशाल' हाती घेतली आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत ते उभे राहणार असल्याचं बोललं जातं आहे. ३ दशकांहून अधिक काळ मंत्रालयात सेवा बजावणारे गृह विभागाचे सहसचिव सिद्धार्थ खरात यांनी अलीकडेच स्वेच्छानिवृत्ती घेतली. मंगळवारी त्यांनी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत पक्षप्रवेश केला. आगामी विधानसभा निवडणुकीत खरात बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर या अनुसूचित जातीसाठी राखीव मतदारसंघातून निवडणूक लढवतील अशी चर्चा आहे. आज मातोश्रीवर पक्ष प्रवेश कार्यक्रमात उद्धव ठाकरे यांनी  खरात यांच्या हातात शिवबंधन बांधून त्यांना पक्षात प्रवेश दिला. या वेळी खा. अरविंद सावंत, माजी खासदार विनायक राऊत, बुलढाणा जिल्ह्यातील शिवसेना नेते प्रा. नरेंद्र खेडेकर, आशिष रहाटे  व जिल्ह्यातील शेकडो शिवसैनिक मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते .

सिद्धार्थ खरात यांनी उच्च व तंत्र शिक्षण विभाग, ग्राम विकास विभाग, गृह विभागामध्ये सहसचिव म्हणून काम केले आहे. अनेक राज्यमंत्री, कॅबिनेट मंत्री व केंद्रीय राज्य मंत्री यांचे  खासगी सचिव म्हणून त्यांनी सेवा बजावली आहे. ते बुलढाणा जिल्ह्यातील  सिंदखेड राजा तालुक्याचे  रहिवाशी असून  त्यांनी आपली नोकरीची जबाबदारी सांभाळून गेली जिल्ह्यातील अनेक विकासकामात योगदान दिलं आहे. 

कल्याणमधील नेत्यांचा प्रवेश, ठाकरे गटात नाराजी

कल्याणच्या एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतील साईनाथ तरे यांनीही उद्धव ठाकरे गटात पक्षप्रवेश केला. मात्र या पक्षप्रवेशामुळे ठाकरे गटातील कार्यकर्ते नाराज आहेत. निष्ठावंतांच्या निष्ठेचा सन्मान करण्यासाठी आणि त्यांच्या मनातील निष्ठा कायम राखण्यासाठी यापुढे असे प्रवेश करण्यात येऊ नये. गद्दार गटातून येणारी माणसे हिंदूहृदयसम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्यावरील निष्ठेसाठी आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या प्रेमापोटी संघटनेत येत असतील तर त्यांच्या पापाचे प्रायश्चित म्हणून त्यांचे खरे उद्देश सिद्ध करण्यासाठी त्यांना पुढील १ वर्ष संघटनेचे कुठलेही पद देण्यात येऊ नये. येणाऱ्या कुठल्याही निवडणुकीत पक्षाचा उमेदवार म्हणून त्यांचा विचार करण्यात येऊ नये याबाबतचे ठराव करून कल्याण जिल्हाप्रमुख अल्पेश भोईर यांच्या नेतृत्वात उद्धव ठाकरेंना शहरातील पदाधिकाऱ्यांनी दिले. मात्र कार्यकर्त्यांची ही नाराजी ओढावून उद्धव ठाकरेंनी साईनाथ तरे यांना पक्षात प्रवेश दिल्याने आगामी काळात ठाकरे गटाचे पदाधिकारी काय भूमिका घेतात याकडे सगळ्यांचे लक्ष लागून राहिले आहे. 

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेShiv Senaशिवसेनाmaharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४