जॉन्सन टाईल्स कंपनीत भीषण आग, 17 वर्षांचा रेकाॅर्ड जळून खाक
By Admin | Updated: May 4, 2017 14:55 IST2017-05-04T14:55:42+5:302017-05-04T14:55:42+5:30
मुंबई-गाेवा राष्ट्रीय महामार्गावरील गडब गावाच्या हद्दीतील जाॅन्सन टाईल्स कंपनीच्या बीएसआर डिपार्टमेंट मध्ये गुरुवारी सकाळी 10.30 वाजता शाॅर्टसर्किटमुळे आग लागली.

जॉन्सन टाईल्स कंपनीत भीषण आग, 17 वर्षांचा रेकाॅर्ड जळून खाक
>ऑनलाइन लोकमत/जयंत धुळप
अलिबाग, दि.4 - मुंबई-गाेवा राष्ट्रीय महामार्गावरील गडब गावाच्या हद्दीतील जाॅन्सन टाईल्स कंपनीच्या बीएसआर डिपार्टमेंट मध्ये गुरुवारी सकाळी 10.30 वाजता शाॅर्टसर्किटमुळे आग लागली. त्यानंतर ही आग शेजारीच असलेल्या गाेडाऊनपर्यंत पाेहाेचली. गाेडाऊनमध्ये टाईल्स पॅकिंग मटेरियल आणि थर्माकोल माेठ्या प्रमाणात हाेते. त्याने पेट घेतल्याने आगीने माेठा भडका घेतला. परिसरात धुराचे लाेट पसरल्याने आजपासच्या गावांत काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले हाेते. आगात काेणत्याही प्रकारची जीवितहाणी झाली नाही.
या आगीचे वृत्त समजताच जेएसडब्लयू कंपनीच्या दाेन तर पेण नगरपरिषदेची एक अग्निशमन गाड्या तत्काळ घटनास्थळी पाेहाेचल्या. तब्बल चार तासांच्या अथक मेहनतीनंतर आग अटाेक्यात आणण्यात या दाेन्ही अग्निशमन दलाच्या जवानांना यश आले.
आगीत लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. त्याच बराेबर बीएसआर डिपार्टमेंट मधील संगणक जळून खाक झाल्याने, टाईल्स निर्मिती, डिस्पॅच, ट्रक लाेडिंग आदी विषयक गेल्या 17 वर्षांचा अत्यंत महत्वपूर्ण रेकाॅर्ड या आगीत नष्ट झाल्याची माहिती कंपनीच्या सूत्रांनी दिली आहे.