शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
7
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
8
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
9
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
10
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
11
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
12
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
13
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
14
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
15
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
16
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
17
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
18
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
19
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
20
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

जॉन्सन ॲण्ड जॉन्सन कंपनीला १६ लाखांचा दंड; ग्राहकांची दिशाभूल करणारी जाहिरात प्रसिद्ध केल्याप्रकरणी कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 22, 2022 10:26 IST

या कंपनीने, ओआरएसएल-रिहायड्रेट,  ओआरएसएल-रेडी तो ड्रिंक इलेट्रोलाइट सोल्युशन,  ओआरएसएल-प्लस ए रेडी टू  ड्रिंक इलेट्रोलाइट सोल्युशन, ओआरएसएल-एफओएस रेडी टू ड्रिंक इलेट्रोलाइट सोल्युशन या चार अन्नपदार्थांची (पेयांची) विविध आजारांच्या उपचारांसाठी आवश्यकता असल्याची जाहिरात प्रसिद्ध केली होती.

मुंबई : औषध असल्याचा दावा करून ग्राहकांची दिशाभूल करणारी जाहिरात प्रसिद्ध केल्याप्रकरणी अन्न आणि औषध प्रशासनाने मे जॉन्सन ॲण्ड जॉन्सन प्रायव्हेट लिमिटेड कंपनीला १६ लाखांचा दंड ठोठावला आहे. या कंपनीने अन्न या वर्गवारीत मोडणाऱ्या ‘ओआरएसएल’ पेयांची जाहिरात केल्यामुळे त्यांच्यावर कारवाई करण्यात आल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. 

या कंपनीने, ओआरएसएल-रिहायड्रेट,  ओआरएसएल-रेडी तो ड्रिंक इलेट्रोलाइट सोल्युशन,  ओआरएसएल-प्लस ए रेडी टू  ड्रिंक इलेट्रोलाइट सोल्युशन, ओआरएसएल-एफओएस रेडी टू ड्रिंक इलेट्रोलाइट सोल्युशन या चार अन्नपदार्थांची (पेयांची) विविध आजारांच्या उपचारांसाठी आवश्यकता असल्याची जाहिरात प्रसिद्ध केली होती. या जाहिरातीच्या अनुषंगाने अन्न सुरक्षा अधिकारी अरविंद कांडेलकर यांनी कंपनीस नोटीस देऊन सखोल चौकशी केली. चौकशीअंती प्रत्येक प्रकरणनिहाय चार लाखांचा असा एकूण १६ लाखांचा दंड ठोठावला.

‘दिशाभूल कराल तरी कारवाई होईल’कायद्यातील तरतुदीकडे दुर्लक्ष करून दिशाभूल करणाऱ्या जाहिराती प्रसिद्ध करणाऱ्या अन्न व्यावसायिक विरुद्ध अन्न सुरक्षा व मानके अधिनियम २००६ अंतर्गत कारवाई करण्यात येईल, असा इशारा अन्न आणि औषध प्रशासन मंत्री संजय राठोड यांनी दिला आहे.

टॅग्स :Food and Drug administrationअन्न व औषध प्रशासन विभागCrime Newsगुन्हेगारी