शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासोबत घाणेरडा खेळ...! आसिम मुनीरच्या प्रेमात पडली अमेरिका, हे काय बोलले टॉप लष्करी कमांडर...?
2
महायुती अन् मविआच्याही एकसंधतेवर प्रश्नचिन्हच; पडघम वाजले, चित्र अस्पष्ट
3
RCB वर मोठी कारवाई होणार? BCCI बैठकीत काय निर्णय घेणार? समोर आली खास अपडेट
4
एक स्मार्ट डिसिजन EPFO कडून मिळवून देईल अधिक पेन्शन; वय आणि कमाईचं कनेक्शन बहुतेकांना माहीत नाही
5
हूल दिलेल्या मान्सूनची पुन्हा चाहूल; राज्यभर ऑरेंज अलर्ट, धो धो बरसणार
6
मराठा आरक्षणावरील सुनावणी १८ जुलैपासून, अंतिम निकालावरच भवितव्य अवलंबून
7
'महाभारत' सिनेमानंतर आमिर खान खरंच निवृत्ती घेणार? चर्चांवर म्हणाला, "आजकाल लोक..."
8
घटस्फोटानंतर दोन महिन्यातच एक्स पतीचं निधन, त्याच्या आठवणीत अभिनेत्री शुभांगी अत्रे भावुक
9
कोपरखैरणेत बेरोजगार पतीचं हादरवणारं कृत्य; पत्नीची मैत्रीण घरात शिरताच उडाला थरकाप
10
आजचे राशीभविष्य, १२ जून २०२५: आजचा दिवस यशदायी, पदोन्नती संभवते, मित्र भेटतील !
11
होमस्टेमध्ये सापडलेल्या 'त्या' गोष्टीमुळे पोलिसांना सोनमवर आला संशय; पुराव्याने हत्येचे गूढ उकले
12
अमेरिका आंदोलनाने पेटली, १२ राज्यांतील २५ शहरांत लोक उतरले रस्त्यावर; लॉस एंजिलिसमध्ये संचारबंदीनंतर आंदोलन चिरडून टाकण्याचा डोनाल्ड ट्रम्प यांचा प्रयत्न
13
सोनमचा भाऊ म्हणाला, तिला फाशीच द्या, कुटुंबाने नातेसंबंध तोडले; मिळाली पोलिस कोठडी
14
आंतरधर्मीय विवाह; कुटुंबांच्या संमतीने विवाह, तुम्ही आक्षेप कशाला घेता? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
15
काश्मीरसाठी थेट रेल्वे सुरू अन् पर्यटनाची गाडी येतेय रुळावर; १० दिवसांचे बुकिंग फुल्ल
16
शू रॅकवर बसल्याने मांजराला नवव्या मजल्यावरून फेकले, आरोपी शेजाऱ्याविरोधात गुन्हा दाखल
17
‘भारतात मतदार यादी तयार करणे, हे जगात सर्वांत कठीण काम’
18
लोकल लेट का होते? ते शोधा, तरच अपघात कमी होतील, मुंब्रा दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर प्रवासी संघटनांचे मत
19
लातूरमध्ये नागरिकाची सतर्कता; ११२ ला काॅल, अन् मुलगा सापडला !
20
नव्या स्थानकांच्या उभारणीत रेल्वेचा हात आखडताच, नवे ठाणे, चिखलोली, दातीवली, मानस मंदिरसह ३२ स्थानकांचा होता प्रस्ताव

कोरोना व अन्य कारणाने मरण पावलेल्या आठ कर्मचाऱ्यांच्या वारसांना पालिका सेवेत नोकरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 29, 2021 12:54 IST

मीरा भाईंदर महापालिकेच्या कायम सेवेतील ८ कर्मचाऱ्यांचे कोविड किंवा इतर कारणांमुळे निधन झालेल्यांच्या वारसांना शासन नियमानुसार महापालिका सेवेत सामावून घेतले जाणार आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क 

मीरा रोड: मीरा भाईंदर महापालिकेच्या कायम सेवेतील ८ कर्मचाऱ्यांचे कोविड किंवा इतर कारणांमुळे निधन झालेल्यांच्या वारसांना शासन नियमानुसार महापालिका सेवेत सामावून घेतले जाणार आहे. नियुक्ती पत्र देणेपुर्वी त्यांना वैद्यकीय तपासणी प्रमाणपत्र सादर करणेबाबतचे पत्र महापौर ज्योत्स्ना हसनाळे व आयुक्त दिलीप ढोले यांच्या हस्ते बुधवारी देण्यात आले.            अनुकंपा तत्वावर नियुक्तीच्या अनुषंगाने महानगरपालिकेच्या मयत कर्मचाऱ्यांची ८ मार्च व ५ एप्रिल रोजी प्रतिक्षासूची करून एकूण ३० उमेदवारांची यादी प्रसिध्द करण्यात आली होती. त्यापैकी ८  दिवंगत झालेल्या कर्मचाऱ्यांच्या पात्र नातेवाईकास वारसा अनुकंपा तत्वावर महापालिकेत सामावुन घेतले जाणार आहे.  त्यात कोविडमुळे  मयत झालेल्या महापालिकेच्या ३ कर्मचा-यांचे वारस आहेत. 

 कोविड व इतर आजाराने निधन पावलेल्या कर्मचाऱ्यांच्या वारसां मध्ये वैशाली सारुक्ते यांना शिपाई पदावर, सुनिता सोनावणे यांना लिपिक - टंकलेखक, रोशन गावडे यास शिपाई तर सिध्देश मंजुळे, पोर्णिमा वंजारी,  विकास जाधव, मिथुन पवार व  सागर केणी या ५ जणांना मजूर पदावर सेवेत सामावून घेतले आहे.            यावेळी उपमहापौर हसमुख गहलोत, स्थायी समिती सभापती दिनेश जैन, सभागृह नेता प्रशांत दळवी,  गटनेत्या निलम ढवण, अतिरिक्त आयुक्त विजयकुमार म्हसाळ, उपायुक्त मारुती गायकवाड, उपायुक्त संजय शिंदे आदी उपस्थित होते. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याMira Bhayander Municipal Corporationमीरा-भाईंदर महापालिका निवडणुक