शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

२२ तारखेचा आणि रामाचा काय संबंध?; जितेंद्र आव्हाडांनी साधला भाजपावर निशाणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 16, 2024 15:05 IST

मंदिर कुणाच्या बापाचे नाही. मंदिरावर कुणाची मालकी नाही. राम हा सगळ्यांचा आहे असंही आव्हाडांनी म्हटलं.

नागपूर - निवडणुकीच्या अगोदर रामाच्या नावाने वातावरण तयार करून त्याचा फायदा घेणे याच ध्येयातून भाजपाने ही तारीख निवडली. २२ तारखेचा आणि रामाचा काही संबंध आहे का? रामनवमी आहे का? रामाचा काय वेगळा दिवस आहे का? असा सवाल करत राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी भाजपावर निशाणा साधला. 

जितेंद्र आव्हाड म्हणाले की, ही मंदिराची वास्तू अपूर्ण आहे. त्यात प्राणप्रतिष्ठा केली जाऊ शकत नाही असं शंकराचार्यांनी सांगितलं आहे. तुमच्या घराचं बांधकाम सुरू आहे, पूर्ण प्लास्टर झाले नाही तर तुम्ही तरी राहायला जाल का?. भाजपानं ४ शंकराचार्यांनाच वेड्यात काढले. त्यांनी हिंदू धर्मासाठी काय केले हे विचारले. हिंदू धर्मीयांना मार्ग शंकराचार्यांनी दाखवला. त्यांनी ४ पीठ निर्माण केलीत. तुम्ही त्यांना मानणारच नसाल तर ठीक आहे तुम्हीच शंकराचार्य आहात एवढेच म्हणता येईल. त्यांचे कॅलेंडर, पचांग वेगळे आहे. त्यामुळे त्यांना काहीही बोलू शकत नाही अशी टीका त्यांनी केली. 

तसेच राम मंदिर होतंय त्याने सगळेच आनंदी आहेत. मीदेखील आनंदी आहे. मंदिर कुणाच्या बापाचे नाही. मंदिरावर कुणाची मालकी नाही. राम हा सगळ्यांचा आहे. राम बहुजन आहे. क्षत्रीय आहे. जर क्षत्रीय नसेल तर भाजपाने पुढे येऊन सांगावे. राम क्षत्रीय म्हणजे बहुजन झाला. या देशात बहुजनांची संख्या सर्वात जास्त आहे. निवडणुकीसाठी भाजपाला रामाची आठवण होते. जनता जर्नादनच आमचा राम आहे. राम तोंडी अन् रावण मनी अशी यांची प्रवृत्ती आहे असंही आव्हाडांनी सांगितले. 

दरम्यान, आम्ही बहुजन आहोत. आम्ही मटण खातो. मी रामाच्या विधानावर खेद व्यक्त केला. जर मटण खाणाऱ्या माणसांना तुम्ही शेण खाता असं म्हणत असाल तर या देशातील ८० टक्के लोक शेण खातात. शेण आणि मटण असं जर तुम्ही बोलणार असाल तर ते तुम्हीही खाता असा टोला टीका करणाऱ्यांना जितेंद्र आव्हाडांनी लगावला. 

'तो' निकाल दिल्लीतून आला होता विधानसभा अध्यक्षांनी दिलेला निकाल हा दिल्लीतून टाईप करून आलेला आहे. त्यामुळे या निकालपत्रात इतक्या उणीवा आहेत जिथे सर्वोच्च न्यायालयाने उद्धव ठाकरेंचा व्हिप मान्य केला. गोगावलेंना रद्दबातल ठरवले. इतकेच नाही तर एकनाथ शिंदे यांची सभागृह नेता म्हणून झालेली नेमणूकही कोर्टाने रद्द केली. त्यानंतर विधानसभा अध्यक्षांनी अशाप्रकारे निर्णय देणे अपेक्षित नव्हते. आता पुढे काय होतंय बघू असं आव्हाड म्हणाले.  

टॅग्स :Ram Mandirराम मंदिरAyodhyaअयोध्याBJPभाजपाJitendra Awhadजितेंद्र आव्हाड