शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

"जितेंद्र आव्हाड मनोविकृत, त्यांच्यावर गुन्हा दाखल व्हावा", मंत्री गुलाबराव पाटलांची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 30, 2024 15:20 IST

जितेंद्र आव्हाड यांनी कायम दोन समाजात भांडण लावण्याचे प्रयत्न केले आहेत, त्यांच्यावर गुन्हा दाखल झालाच पाहिजे, असे गुलाबराव पाटील यांनी म्हटले आहे. 

जळगाव : गेल्या काही दिवसापासून शालेय अभ्यासक्रमात मनुस्मृतीच्या श्लोकांचा समावेश होणार असल्याचा मुद्दा चर्चेत  आहे. यावर 'राष्ट्रवादी शरदचंद्र पवार' पक्षाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी निषेध करत बुधवारी महाड येथे चवदार तळ्याजवळ आंदोलन केले. जितेंद्र आव्हाड यांनी महाड येथे मनुस्मृतीचे दहन केले. मात्र, यावेळी जितेंद्र आव्हाड आणि त्यांच्या कार्यकर्त्यांकडून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो असलेले पोस्टरही फाडण्यात आल्याचे समोर आले. यामुळे आता जितेंद्र आव्हाड यांच्यावर राजकीय वर्तुळात आरोप सुरू आहेत. यावर मंत्री गुलाबराव पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. जितेंद्र आव्हाड हे मनोविकृत आहेत. जितेंद्र आव्हाड यांनी कायम दोन समाजात भांडण लावण्याचे प्रयत्न केले आहेत, त्यांच्यावर गुन्हा दाखल झालाच पाहिजे, असे गुलाबराव पाटील यांनी म्हटले आहे. 

जितेंद्र आव्हाड यांनी केलेला प्रकार हा वाईट आहे. अशा माणसावर गुन्हा दाखल झालाच पाहिजे. देशाचे घटनाकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा आपल्या हातात आहे, हे ज्या माणसाला कळत नाही. हा मनोविकृत माणूस आहे, अशा शब्दांत गुलाबराव पाटील यांनी टीका केली आहे. तसेच, जितेंद्र आव्हाड यांनी कायम दोन समाजात भांडण लावण्याचे प्रयत्न केले आहेत, असा आरोप गुलाबराव पाटील यांनी केला. याशिवाय, महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो जितेंद्र आव्हाड यांनी फाडला आहे. त्यांच्यावरती गुन्हा दाखल व्हावा, अशी मागणीही गुलाबराव पाटील यांनी केली आहे.  

दरम्यान, भाजपा नेते आशिष शेलार यांनी जितेंद्र आव्हाड यांच्यावर कारवाईची मागणी केली आहे. खोटं बोलण्याला मर्यादा असते, जितेंद्र आव्हाड खोटं बोलत आहेत. शिक्षण विभाग मनुस्मृतीचा कोणताही भाग घेणार नाही, याबाबत शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी स्पष्टीकरण दिले आहे. तरीही आंदोलन केले जात आहे, लोकांच्यात गोंधळ निर्माण केला जात आहे. मनुस्मृतीच्या पोस्टरवर बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो लावण्याचा अर्थ काय होता? डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो फाडला आहे, हा सरळ सरळ डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अनुयायींचा अपमान आहे, याचा आम्ही तीव्र निषेध करत आहोत, असे म्हणत जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात कारवाई करण्यात यावी, अशी मागणीही आशिष शेलार यांनी केली आहे. 

टॅग्स :Jitendra Awhadजितेंद्र आव्हाडGulabrao Patilगुलाबराव पाटील