शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

Jitendra Awhad Video: ती माझ्या अंगावर पडली असती तर...; जितेंद्र आव्हाडांनी केले गंभीर आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 15, 2022 16:11 IST

Jitendra Awhad interview after Anticipatory Bail: आता मी व्हिडीओ पाहिल्यावर हे लक्षात येतेय, काय प्लॅनिंग करतात वा, असे आव्हाड म्हणाले. 

जितेंद्र आव्हाड यांना भाजपाच्या महिला कार्यकर्त्याने दाखल केलेल्या विनयभंगाच्या गुन्ह्यात अटकपूर्व जामीन मिळाला आहे. यानंतर आव्हाड यांची पहिली प्रतिक्रिया लोकमतने घेतली. यामध्ये आव्हाड यांनी या महिलेवर गंभीर आरोप केले आहेत. एक दिवस ही महिला मुंब्र्याला आग लावल्याशिवाय राहणार नाही, अशा शब्दांत आव्हाड यांनी तक्रारदार महिलेवर टीका केली आहे. 

दोन्ही गुन्हे खोटे आहेत. पहिल्या गुन्ह्यात मी त्या माणसाला बाहेर घेऊन जाताना दिसतोय. त्या माणसाची मुलाखत आहे. कालच्या घटनेत मी त्या महिलेला गर्दीत जाऊ नका असा सल्ला दिला. माझा जर काही उद्देश असता... हा पूर्वनियोजित कट होता. ती महिला समोरून चालत येत होती. जितेंद्र आव्हाड समोरून चालत येतोय म्हटल्यावर समोरचा माणूस बाजुला होतो. एवढ्या गर्दीत एकटी महिला कधी येत नाही. तिच्या डोक्यात आधीच प्लॅन होता. ती मुद्दामहून समोरून चालत येत होती, असे आव्हाड म्हणाले. 

नशीबाने मी तुम्ही बाजुला व्हा म्हणून बाजुला केले. उद्या जर त्या माझ्या अंगावर पडल्या असत्या तर मी काहीही बचाव करू शकलो नसतो. देवाने मला वाचविले, अशी प्रतिक्रिया जितेंद्र आव्हाड यांनी अटकपूर्व जामीन मिळाल्यानंतर दिली. आता मी व्हिडीओ पाहिल्यावर हे लक्षात येतेय, काय प्लॅनिंग करतात वा, असे आव्हाड म्हणाले. अनेक महिला हक्कांसाठी लढणाऱ्या कार्यकर्त्या माझ्याबाजुने उभ्या राहिल्या. अंजली दमानियांशी आमच्या वेगळ्या लढाया असतात. जितेंद्र आव्हाड असे काही करेल यावर विश्वास बसत नाही या भगिनींच्या भावना सुखावणाऱ्या आहेत, अशा शब्दांत आव्हाड यांनी आभार मानले. 

एवढे नीच राजकारण ही महिला मुंब्र्यात आल्यानंतर सुरु झालेय. छट पुजेत असेच कांगावे केले. तिचा व्हिडीओ व्हायरल झालाय. तिने अनेक पुरुषांना त्रास दिला आहे. आरएसएसचे पुराणिक म्हणून आहेत, तिने त्यांचे काय केलेय हे पहा. हे तिचे हक्काचे प्रयोग आहेत. ही महिला एके दिवशी मुंब्र्याला आग लावेल, याचे आज मी भाकीत करतोय, अशी टीका आव्हाड यांनी केली. 

पोलीस मलाच सांगत होते, वरून दबाव आहे. अरे व्हिडीओ पहायला पाहिजे होता. दबावाखाली उद्या तुम्ही बलात्काराच्या आरोपात आत टाकाल, अशी टीका आव्हाड यांनी पोलिसांवर केली. आम्ही उच्च न्यायालयात जाण्याची तयारी केली आहे. मुंबईतील दहा महिला कार्यकर्त्या हायकोर्टात याविरोधात दाद मागणार आहेत. प्रीती शर्मा मेनन सारख्या महिलांशी आमचे विविध गोष्टींवरून वाद आहेत. या सर्व महिला माझ्या बाजुने उभ्या राहिल्या. मी काय कमावले, हेच कमावले, असे सांगत आव्हाड भावूक झाले. 

ज्या पद्धतीने पोलीस वागतायत ते वाईट आहे. शपथ घेताना जे म्हटलेले त्यानुसार वागायला पाहिजे. तुम्ही कोणत्याही सरकारचे नोकर नसता. सरकारी नोकर असता, यामुळे कायद्यानेच वागले पाहिजे होते, असेही आव्हाड म्हणाले.  

टॅग्स :Jitendra Awhadजितेंद्र आव्हाडMolestationविनयभंगCourtन्यायालय