शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

जितेंद्र आव्हाडांच्या मुलीचा आता गोव्यात खिश्चन पद्धतीनं पार पडला विवाह सोहळा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 20, 2021 00:18 IST

जितेंद्र आव्हाड यांच्या मुलीचे नुकतेच 7 डिसेंबरला विशेष मॅरेज अॅक्टनुसार नोंदणी पद्धतीने लग्न झाले होते.

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या मुलीचे नुकतेच 7 डिसेंबरला विशेष मॅरेज अॅक्टनुसार नोंदणी पद्धतीने लग्न झाले होते. एकीकडे अनेक नेते आपल्या मुलांचे लग्न अत्यंत थाटामाटात लावत असतानाच, आव्हाड यांनी मात्र अत्यंत साधे पणाने आपल्या मुलीचे लग्न लावून दिले होते. आव्हाडांची कन्या नताशा हिचे लग्न एलन पटेलसोबत झाले आहे. यानंतर आता रविवारी या जोडप्याचा गोव्यात ख्रिश्चन पद्धतीने थाटात विवाह पार पडला. एलन पटेलच्या कुटुंबीयांच्या इच्छेनुसार हे लग्न गोव्यात पार पडले आहे. यासंदर्भात स्वतः जितेंद्र आव्हाड यांनी ट्विटही केले आहे.

नताशा आणि एलन यांच्या या ख्रिश्चन पद्धतीने झालेल्या विवाह सोहळ्याला राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, शिव सेना नेते एकनाथ शिंदे, मिलिंद नार्वेकर आदी उपस्थित होते, असे समजते.

लेकीच्या इच्छेनुसार लग्न साधेपणाने केलं - नताशा आव्हाड हिचा विवाह एलन पटेल यांचा विवाह नोंदणी पद्धतीने विशेष मॅरेज अॅक्टनुसार झाला. रजिस्टर पद्धतीने करण्यात आलेल्या या लग्नात काही मोजकेच पाहुणे उपस्थित होते. नताशा ही जितेंद्र आव्हाड यांची एकुलती एक मुलगी आहे. एलेन पटेल यांच्याशी तिचा विवाह पार पडला. एलेन आणि नताशा इयत्ता पहिलीपासून एकत्र शिकले आहेत. नताशाचं शिक्षण एमएस इन मँनेजमेंटमध्ये झालं आहे. तर एलेनचं शिक्षण एमएस अँड फायनान्स मँनेजमेंटमध्ये झाले आहे. एलेन स्पेनमधल्या एला मल्टीनॅशनल कंपनीत नोकरीला आहे. मुलीच्या इच्छेनुसार आव्हाड यांनी तिचं लग्न रजिस्टर पद्धतीने केलं होतं. 

मुलीच्या लग्नावेळी जितेंद्र आव्हाड भावूक झाले होते. वडिलांच्या डोळ्यात आलेले पाणी पाहून नताशा आव्हाडही भावूक झाली होती. २५ वर्ष आपल्या अंगा-खांद्यावर खेळलेली मुलगी आपल्या घरात नसणार ही भावना खूप वेदनादायी आहे, असे सांगताना जितेंद्र आव्हाड यांना अश्रू आवरत नव्हते. 

टॅग्स :Jitendra Awhadजितेंद्र आव्हाडmarriageलग्नgoaगोवा