शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात आठवडाभर गारपीटीसह अवकाळीची शक्यता; शेतकऱ्यांनो सावध रहा....
2
सामाजिक विविधतेसाठी अधिक पोषक होतेय वातावरण; हिंदूंची संख्या घटली, मुस्लिमांची वाढली
3
बारामतीची निवडणूक संपली अन् पवार कुटुंबातला मुलगा, मुलीचा मुद्दा पुन्हा चर्चेत
4
‘विराट’ कामगिरीमुळे RCBचं आव्हान कामय, पण प्लेऑफमध्ये जाण्यासाठी लागेल नशिबाची साथ, आणि...
5
संपादकीय: शरद पवारांचा खडा अन् विरोधक उद्धव ठाकरेंच्या मागे लागले...
6
विवाह नोंदणी नाही तर प्राजक्ता माळीने 'या' कागदपत्रांवर केली सही, नेटकऱ्यांनी लावले अंदाज
7
इलेक्शन ड्युटी टाळण्यासाठी पुरुष शिक्षकाने गर्भवती असल्याचे भासवले; अधिकाऱ्यांनी चौकशीचे आदेश दिले
8
आजचे राशीभविष्य - १० मे २०२४; इतर काही मार्गानी आर्थिक लाभ होतील, व्यवसायात प्रगती होईल
9
सलग ३४ वर्षे आमदार! सुरेशदादा जैन सक्रिय राजकारणातून निवृत्त; उद्धवसेनेच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा
10
एअर इंडियाचा संप मागे; 'ते' कर्मचारी कामावर
11
प्रियांका गांधी अखेर मैदानात उतरल्या! जिथे जिथे जातात...
12
दिंडोरीत अजित पवार नाराज, नंदुरबार-जळगावात शिंदे गट; असहकार्याने महायुतीत टेन्शन! 
13
आजी, माजी गृहमंत्री एकाच हॉटेलात मुक्कामी पण...दोघेही म्हणतात आम्ही एकमेकांना भेटलो नाही
14
खासदारकीसाठी कुणाकुणाला भेटलात, दावोसच्या गुलाबी थंडी काय केले? प्रियंका चतुर्वेदींना शिंदे सेनेचा सवाल
15
द्वेष नव्हे तर नोकरी निवडा; 'इंडिया' येणार अन् ३० लाख नोकऱ्या देणार
16
या समोरासमोर अन् एकदा काय ती चर्चा होऊनच जाऊद्या! माजी न्यायाधीशांचे पंतप्रधान अन् राहुल गांधींना आमंत्रण
17
प्रचारात मोदी टॉपवर; आतापर्यंत ८३ सभा! प्रचार करण्यात विरोधक जवळपासही नाहीत
18
साचलेले प्रश्न, दमलेले कार्यकर्ते, मरगळलेला प्रचार
19
सत्ताधारी वायएसआर काँग्रेसला अँटी इन्कम्बन्सीची भीती; सर्व जमिनींची नोंद 'या' पक्षाला महागात पडणार?
20
डॉ. दाभोलकर हत्या खटल्याचा आज निकाल; घटनेला १० वर्षे, अडीच वर्षे चालली सुनावणी

सिंचन घोटाळ्यातील आरोपी जिगर ठक्करची गोळी झाडून आत्महत्या ; गाडीत सापडली कागदपत्रे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 28, 2018 4:25 AM

गोसीखुर्द जलसिंचन घोटाळ्यातील आरोपी आणि डी. ठक्कर कन्स्ट्रक्शन प्रायव्हेट लिमिटेडचे मालक प्रवीण ठक्कर यांचा मुलगा जिगर ठक्कर (४०) याने मंगळवारी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास डोक्यात गोळी झाडून आत्महत्या केली.

मुंबई : गोसीखुर्द जलसिंचन घोटाळ्यातील आरोपी आणि डी. ठक्कर कन्स्ट्रक्शन प्रायव्हेट लिमिटेडचे मालक प्रवीण ठक्कर यांचा मुलगा जिगर ठक्कर (४०) याने मंगळवारी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास डोक्यात गोळी झाडून आत्महत्या केली. आत्महत्येमागचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र पोेलिसांनी ठक्करच्या गाडीतून सिंचन घोटाळ्यासंदर्भातील काही कागदपत्रे ताब्यात घेतली असून त्याचा तपास सुरू आहे.घाटकोपरला राहणारा जिगर सायंकाळी सहाच्या सुमारास चेंबूर येथील त्याच्या कार्यालयातील काम उरकून मरीन ड्राइव्ह येथील एका बँकेत आला होता. तेथून त्याने मरिन प्लाझा गाठले. नंतर त्याने चालक सुनील सिंग याला गाडी पार्क करायला सांगितले.ड्रायव्हरला बाजूला जायला सांगून त्याने आपल्याकडील परवाना असलेल्या रिव्हॉलवरमधून डोक्यात गोळी झाडून स्वत:ला संपविले. मरिन ड्राइव्ह पोलिसांनी त्याचा मृतदेह ताब्यात घेऊन जीटी रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवला.घोटाळ्याचे आरोपपत्रही दाखल-मोखाबर्डी उपसा सिंचन योजनेतील पुच्छ शाखा कालवा मातीकाम व बांधकामाचे कंत्राट मुंबईतील आर. जे. शहा अ‍ॅण्ड कंपनी आणि डी ठक्कर कन्स्ट्रक्शन प्रायव्हेट लि. कंपनीला देण्यात आले होते. त्यात गैरप्रकार झाल्याचा दावा करीत एसीबीने दोन्ही कंपन्यांचे संचालक कालिंदी राजेंद्र शाह, तेजस्विनी राजेंद्र शाह, त्यांच्या भागीदार कंपनीचे संचालक विशाल प्रवीण ठक्कर, प्रवीण नाथालाल ठक्कर, जिगर प्रवीण ठक्कर, अरुणकुमार गुप्ता, तत्कालीन कार्यकारी अभियंता उमाशंकर वासुदेव पर्वते व विभागीय लेखाधिकारी चंदन जिभकाटे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. या सर्वांवर जानेवारीत एसीबीकडून ४ हजार ४५७ पानांचे आरोपपत्रही दाखल केले आहे.

टॅग्स :Suicideआत्महत्याMumbaiमुंबई