झिशानला अदानी गु्रपची नोकरी
By Admin | Updated: June 1, 2015 04:51 IST2015-06-01T04:51:54+5:302015-06-01T04:51:54+5:30
केवळ मुसलमान आहे म्हणून एका कंपनीने नोकरी नाकारलेला झिशान खान लवकरच अदानी गु्रपचा विशेष प्रशिक्षक म्हणून कार्यरत होणार आहे

झिशानला अदानी गु्रपची नोकरी
मुंबई : केवळ मुसलमान आहे म्हणून एका कंपनीने नोकरी नाकारलेला झिशान खान लवकरच अदानी गु्रपचा विशेष प्रशिक्षक म्हणून कार्यरत होणार आहे. यासाठी त्याने या गु्रपच्या अहमदाबाद येथील मुख्य कार्यालयात जाऊन नोकरीच्या करारावर स्वाक्षऱ्या केल्या आणि आता अदानीच्या मुंबईतील कार्यालयात तो रुजू होणार आहे.
एमबीए पूर्ण केल्यावर खानने हरे कृष्णा या कंपनीत नोकरीसाठी अर्ज केला होता. त्यावर मुसलमानांना नोकरी देत नसल्याचे या कंपनीने ई-मेलद्वारे कळवले. या घटनेबाबत विविध सामाजिक स्तरांतून रोष व्यक्त करण्यात आला. यासंदर्भात करण्यात आलेल्या तक्रारीनंतर कंपनीने जाहीर माफी मागितली. या घटनेनंतर खानला अनेक कंपन्यांकडून नोकरीच्या आॅफर आल्या. त्यातून त्याने अदानी ग्रुपला प्राध्यान दिले. ही घटना घडल्यानंतर मला अनेक कंपन्यांनी ई-मेल करून नोकरीची आॅफर दिली. अदानी गु्रपनेही नोकरीचा मेल केला होता. या सर्व मेलमधून मी अदानी कंपनीची निवड केली. कारण ही कंपनी उत्कृष्ट आहे, असे खानने सांगितले. तर आपण जात व धर्मापेक्षा बुद्धिमतेला प्राधान्य
दिले पाहिजे; आणि झिशानमध्ये कर्तृत्व आहे त्यामुळेच त्याला नोकरीची आॅफर देण्यात आली, असे कंपनीचे म्हणणे आहे.