जेट एअरवेजचे मुंबई-नागपूर विमान रायपूरकडे ‘डायव्हर्ट’
By Admin | Updated: August 22, 2014 01:33 IST2014-08-22T01:33:42+5:302014-08-22T01:33:42+5:30
मुंबईवरून नागपूरला आलेल्या जेट एअरवेजच्या विमानाला खराब वातावरणामुळे एटीसीने (एअर ट्रॅफिक कंट्रोल) विमान उतरविण्याची परवानगी नाकारून हे विमान रायपूरकडे वळविले.

जेट एअरवेजचे मुंबई-नागपूर विमान रायपूरकडे ‘डायव्हर्ट’
नागपूर : मुंबईवरून नागपूरला आलेल्या जेट एअरवेजच्या विमानाला खराब वातावरणामुळे एटीसीने (एअर ट्रॅफिक कंट्रोल) विमान उतरविण्याची परवानगी नाकारून हे विमान रायपूरकडे वळविले.
मुंबईवरून सायंकाळी ५ वाजता हे विमान नागपूरच्या आकाशात आले. विमानाच्या पायलटने एटीसीला विमान उतरविण्याची परवानगी मागितली. परंतु ‘व्हिजिबिलिटी’ कमी असल्यामुळे एटीसीने विमान उतरविण्याची परवानगी नाकारून विमान रायपूरकडे नेण्यास सांगितले. त्यामुळे नागपुरात येऊनही हे विमान रायपूरकडे नेण्यात आले. सायंकाळी ६.३० वाजता हे विमान रायपूरवरून नागपूरला येऊन मुंबईकडे झेपावणार होते.
दरम्यान, या विमानाने नागपूरवरून मुंबईला जाणाऱ्या प्रवाशांना विमानाची वाट पाहत विमानतळावर बसून राहण्याची पाळी आली. (प्रतिनिधी)