जेली फिशनी घेतला २८ जणांना चावा

By Admin | Updated: September 10, 2014 03:33 IST2014-09-10T03:33:22+5:302014-09-10T03:33:22+5:30

अनंत चतुर्दशीच्या दिवशी जुहू चौपाटीवर आलेल्या जेली फिशनी २८ गणेशभक्तांना चावा घेतला. सगळ्यांना कूपर रुग्णालयात नेण्यात आले होते.

Jelly Fishna took 28 people bite | जेली फिशनी घेतला २८ जणांना चावा

जेली फिशनी घेतला २८ जणांना चावा

मुंबई : अनंत चतुर्दशीच्या दिवशी जुहू चौपाटीवर आलेल्या जेली फिशनी २८ गणेशभक्तांना चावा घेतला. सगळ्यांना कूपर रुग्णालयात नेण्यात आले होते. यापैकी दोघांना दाखल करून मंगळवारी डिस्चार्ज देण्यात आला. सगळ्यांची प्रकृती स्थिर आहे.
च्जुहू चौपाटीवर सायंकाळी गणपती विसर्जनासाठी आलेले गणेशभक्त पाण्यात गेले होते. तेव्हा त्यांना जेली फिश चावले. २८ जणांना कूपर रुग्णालयात नेण्यात आले. २६ जणांवर प्राथमिक उपचार केल्यावर त्यांना घरी सोडून देण्यात आले.
च्एकाला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, त्याला मंगळवारी सकाळी सोडण्यात आले; तर सूरज पटवा (१७) यालादेखील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचार केल्यानंतर त्याची प्रकृती स्थिर झाली.
च्मंगळवारी रात्री त्याला घरी सोडण्यात आले. सर्वांची प्रकृती आता स्थिर आहे, असे रुग्णालय प्रशासनाकडून सांगण्यात आले.

Web Title: Jelly Fishna took 28 people bite

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.