शहरं
Join us  
Trending Stories
1
मनसेसोबत युतीसाठी उद्धव ठाकरेंची मविआतून बाहेर पडण्याची तयारी?; बाळा नांदगावकरांचं सूचक विधान
2
भंडाऱ्याचे काँग्रेस खासदार प्रशांत पडोळेंच्या गाडीचा भीषण अपघात; ट्रकची धडक, चौघांना किरकोळ दुखापत
3
Ladki Bahin Yojana: 'मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने'च्या ऑगस्ट महिन्याचा हप्ता कधी येणार? आदिती तटकरेंनी दिली माहिती
4
तालिबानचे नवे फर्मान! इस्लामविरोधी असल्याचे सांगत अफगाण शाळांमधून काढून टाकले ५१ विषय
5
सणासुदीपूर्वी सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा घसरण; खरेदीपूर्वी पाहा १४ ते २४ कॅरेट सोन्याची नवी किंमत
6
'शिवाजीनगर मेट्रो स्टेशनचे नाव सेंट मेरी करा'; आमदाराच्या मागणीला CM सिद्धरामय्यांचा होकार
7
Navratri 2025: नवरात्रीची सुरुवात कधीपासून? घटस्थापनेचे महत्त्व, नऊ रंग आणि उत्सवाची पार्श्वभूमी जाणून घ्या
8
Milk Rate: ४ रुपयांनी स्वस्त होणारे का अमूलचं दूध? कंपनीच्या एमडींनी सांगितला संपूर्ण प्लान
9
भारताच्या 'या' राज्यात राहतात सर्वाधिक नेपाळी लोक, सरकारी सोयीसुविधांचाही घेतात लाभ!
10
"तुमची मुलगी नक्षलवादी आहे, तिचे आधारकार्ड द्या !" पोलिसांना माओवाद आणि मार्क्सवाद यातील फरक समजत नाही का?
11
विश्रांतीनंतर उपमुख्यमंत्री अजित पवार 'अँक्शन मोड'मध्ये! प्रशासनाला दिले महत्त्वाचे आदेश
12
पत्नीचं अफेअर, घराच्या छतावर चाळे करताना पतीने बॉयफ्रेंडसह पकडलं, त्यानंतर दिली ऐकून थरकाप उडेल अशी शिक्षा
13
भारतात राहून पोस्ट ग्रॅजुएशन अन् देशालाच उडवण्याची योजना; पोलिसांनी सांगितले अटक केलेल्या ५ दहशतवाद्यांचे मनसुबे! 
14
साखरेच्या डब्यात मुंग्याच मुंग्या; पाहून डोक्याचा होतो भुगा, 'या' घरगुती उपायाने होतील छूमंतर
15
VIDEO: बापरे... मगर आणि पाणघोडा आले समोरासमोर, दोघांमध्ये तुफान जुंपली... कोण जिंकलं?
16
"प्रत्येक खासदाराला १५ कोटी देऊन भाजपाने मत खरेदी केले"; 'क्रॉस व्होटिंग'वर सर्वात मोठा दावा
17
"आता पहिल्यासारखं आयुष्य नाही..."; एकाच मुलीशी लग्न करणाऱ्या २ भावांवर कोसळला दु:खाचा डोंगर
18
नवीन गाडीची डिलिव्हरी घेताना अपघात झाला तर? महिंद्रा थारच्या घटनेतून जाणून घ्या विमा क्लेमचे नियम
19
Google Pixel 9: चक्क अर्ध्या किंमतीत खरेदी करा गुगल पिक्सेल ९; कॅमेऱ्यानं अनेकांना लावलंय वेड!

जेजुरीगडाची सुरक्षाव्यवस्था ‘खंडोबाभरोसे’

By admin | Updated: August 16, 2016 23:23 IST

जेजुरीतील कुलदैवत खंडोबा मंदिर व गडकोट आवारामध्ये प्रवेश करणाºया भाविकभक्तांची सुरक्षाव्यवस्था केवळ ‘खंडोबाभरोसे’ असल्याचा प्रत्यय पोलीस यंत्रणेला आला.

ऑनलाइन लोकमत
जेजुरी, दि. १6 -  जेजुरीतील कुलदैवत खंडोबा मंदिर व गडकोट आवारामध्ये प्रवेश करणा-या भाविकभक्तांची सुरक्षाव्यवस्था केवळ ‘खंडोबाभरोसे’ असल्याचा प्रत्यय पोलीस यंत्रणेला आला. सुटीच्या दिवसाचा योग साधून सहायक पोलीस निरीक्षक रामदास वाकोडे यांनी गडावरील सुरक्षा यंत्रणेची पाहणी केली. या वेळी त्यांना सुरक्षा यंत्रणेत अनेक प्रकारच्या त्रुटी आढळून आल्या. या त्रुटी कमी करण्याच्या दृष्टीने त्यांनी सूचना केल्या. 
रविवारी तसेच शासकीय सुटीच्या दिवशी भाविकांची देवदर्शनासाठी रीघ लागलेली असते. सध्या श्रावण महिना व सलग तीन दिवस सुट्या आल्याने भाविकांची गर्दी अधिक होती. या साºया पार्श्वभूमीवर सुरक्षेबाबत काही तक्रारी आल्याने ही पाहणी करण्यात आली. 
गडकोट आवारामध्ये लाखो रुपये खर्च करून ४० सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. ४ महिलांसह २२ सुरक्षारक्षक सेवेत असल्याचे सांगितले जाते. तर, ८ शिपाई आहेत. गडावर प्रवेश करण्यासाठी उत्तर बाजूच्या मुख्य प्रवेशद्वारासह पूर्व व पश्चिम दिशेला असलेल्या मार्गावर  डोअर मेटल डिटेक्टर बसविण्यात आले आहेत. मात्र, तरीही खिसेकापू व दागिने चोरीच्या घटना सर्रास घडतात.  माघपौर्णिमा, चैत्रपौर्णिमा, सोमवती अमावास्या व दसरा या यात्रांव्यतिरिक्त रविवारी व गर्दीच्या वेळी उत्तर दरवाजासह इतर दोन मार्गांवर  मेटल डिटेक्टर असले, तरी तेथे  कोणीही सुरक्षारक्षक नसतो. वास्तविक, गडकोटांतील तिन्ही मार्गांवर प्रत्येकी एक महिला व एक पुरुष सुरक्षारक्षक हातात मेटल डिटेक्टर घेऊन असायला हवा; मात्र ते दिसून येत नाहीत. पोलीस अधिकारी अथवा वरिष्ठांनी याबाबत विचारणा केली असता जेवणासाठी गेलो होतो अथवा वाट्टेल ती जुजबी कारणे सांगून वेळ मारून नेली जाते. विशेष म्हणजे, हातातील मेटल डिटेक्टर यंत्र चार्जिंग करून घ्यावे लागते, याचेही भान येथील कर्मचाºयांना नव्हते, असे पाहणीच्या वेळी निदर्शनास आले. 
पोलीस ठाण्याचे सहा. पोलीस निरीक्षक रामदास वाकोडे, उपनिरीक्षक श्रीकांत देव यांनी रविवारी (दि. १४) मंदिराला भेट देऊन पाहणी केली. गडाच्या ३ प्रमुख प्रवेशमार्गांवर डोअर मेटल  डिटेक्टरमधूनच भाविकांनी प्रवेश करावा. एक महिला व एक पुरुष सुरक्षारक्षक यांनी हातातील मेटल डिटेक्टरने प्रत्येक भाविकाची तपासणी करून गडाच्या आवारात त्याला प्रवेश द्यावा. उत्तर दिशेकडून प्रवेश देताना देवदर्शन झाल्यानंतर पश्चिम दिशेकडून भाविकांनी बाहेर पडावे. तिन्ही प्रवेशद्वारांवर महिला व पुरुष सुरक्षारक्षक असावेत. हातातील व डोअर मेटलडिटेक्टर यंत्रणेची वेळोवेळी दुरुस्ती करून घ्यावी, अशा सूचना त्यांनी दिल्या. 
'व्हीआयपी' म्हणून आलेल्या मर्जीतील लोकांना खास मंदिरप्रवेशद्वारातून नेऊन देवदर्शन घडविले जाते. तासन् तास लहान मुले घेऊन दर्शनरांगेत उभ्या असलेल्या भाविकांची यामुळे गैरसोय होते. व्यवस्थापनातील कर्मचारी व मंदिरातील सेवेकरी यांना हाताशी धरूनही किंवा विश्वस्तांची ओळख सांगून हा प्रकार सुरू असल्याने गर्दीच्या काळात व्यवस्थापन  कोलमडते. 
 
अन् सुरक्षारक्षक लगेच गायब!
सुरक्षा पाहणीचा कार्यक्रम पार पडला. अधिकारी सूचना देऊन निघून गेले आणि केवळ काही तासांचाच अवधी लोटला. प्रवेशद्वारावरील सुरक्षारक्षक पुन्हा गायब झाले होते. 
 
गडकोडांवरील झिजलेले दगड धोकादायक
पुरातन खंडोबागडावरील दगडी ओव-या व सज्जा यांच्या दगडांची मोठ्या प्रमाणात झीज झाली आहे. बहुतेक ठिकाणी दगड निसटण्याच्या मार्गावर आहेत. दोन वर्षांपूर्वी मुख्य मंदिराच्या मागील बाजूचा एक कलाकुसरीचा दगड निखळून पडला होता. सुदैवाने तेव्हा कुणालाही इजा झाली नव्हती. काही दिवसांपूर्वी गडकोट आवार व पायरीमार्गाच्या दुरुस्ती डागडुजीचे काम हाती घेण्यात आले होते. मात्र विश्वस्तांच्या मतभेदामुळे या कामाला खीळ बसली.
 
प्रशिक्षण कुणी द्यायचे?
येथील सुरक्षारक्षकांना प्रशिक्षणाची आवश्यकता असून, त्याची जबाबदारी कुणी घ्यायची, असा प्रश्न आहे. कारण मागील काळात एका पोलीस अधिका-यांनी मंदिरासह आवारात सुरक्षेबाबत लक्ष घातले होते. मात्र, मंदिरातील काही जणांनी त्यावर आक्षेप घेऊन वरपर्यंत तक्रारींचा व नाराजीचा सूर आळवला होता.
 
प्रत्यक्ष प्रयत्नही तोकडे...
काही वर्षांपूर्वी एका पोलीस अधिका-यांने गर्दीच्या वेळी-दर रविवारी गडावर प्रत्यक्ष हजर राहून सुरक्षाव्यवस्था बळकट करण्याचा प्रयत्नही केला होता. मात्र, या सुरक्षाव्यवस्थेमुळे काहींनी नाराजी व्यक्त केल्याने त्या पोलीस अधिका-याने सुरक्षाव्यवस्था काढून घेतली होती.
 
जेजुरी गडावर अशी आहे सुरक्षा : 
४ महिला २२ पुरुष सुरक्षारक्षक 
देवसंस्थान व्यवस्थापनाचे३४ कर्मचारी, तर ४ पोलीस जवान कार्यरत...
४० सीसीटीव्ही कॅमेरे, तीन प्रमुख द्वारांवर डोअर मेटल डिटेक्टर