जेजुरी देवस्थानाची विकासकामेही वादग्रस्त

By Admin | Updated: November 28, 2014 23:08 IST2014-11-28T23:08:27+5:302014-11-28T23:08:27+5:30

जेजुरी मरतड देवस्थानने केलेल्या विकासकामांचीही चौकशी करा, अशी मागणी जेजुरी शिवसेनेच्या वतीने करण्यात आली आहे.

Jejuri Devasthan's development work is also controversial | जेजुरी देवस्थानाची विकासकामेही वादग्रस्त

जेजुरी देवस्थानाची विकासकामेही वादग्रस्त

जेजुरी : जेजुरी मरतड देवस्थानने केलेल्या विकासकामांचीही चौकशी करा, अशी मागणी जेजुरी शिवसेनेच्या वतीने करण्यात आली आहे. चौकशी न झाल्यास आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
जेजुरी मरतड देवस्थानमधील विश्वस्तात मोठे मतभेद असून, देवस्थानच्या हिताचे ते कोणतेच निर्णय घेऊ शकत नाहीत. विकासकामे करतानाही एकमेकांना विश्वासात न घेता 1क् लाख रुपयांची दुरुस्ती कामे केली आहेत. या विकासकामांची ही चौकशी व्हायला हवी. देवस्थानच्या कस्टडीतील पावती पुस्तके स्वत:च्या घरी नेऊन देणगी गोळा करणो, देणगीच्या त्या पावत्यांत ही खाडखोड करणो आदी  भ्रष्टाचाराची गंभीर प्रकरणो पुढे येत आहेत. देवसंस्थानवर देखरेख व विश्वस्त नियुक्त्या करणा:या धर्मादाय आयुक्त कार्यालयाने यांची संपूर्ण चौकशी करून दोषींवर कायदेशीर कारवाई करावी. त्यांची विश्वस्तपदे रद्द करावीत,   अशी मागणी जेजुरी शहर शिवसेनेच्या वतीने एका पत्नाद्वारे केली आहे. ही कारवाई त्वरित करून त्यांची अंमलबजावणी करावी; अन्यथा शिवसेनेच्या वतीने तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही या पत्नाद्वारे दिला आहे. तसे पत्न सेनेचे शहरप्रमुख महेश स्वामी यांनी प्रसिद्धीसाठी दिले आहे. देवसंस्थानच्या या कारभाराबाबत संपूर्ण शहरातून संतप्त प्रतिक्रिया येत आहेत. अवघ्या महाराष्ट्राचे कुलदैवत असणा:या खंडोबा मंदिराची देखभाल करणारे हे विश्वस्त मंडळ देवसंस्थानला बदनाम करत असून, त्यांची चौकशी करून देवसंस्थान कामिटीच बरखास्त करण्याची मागणी होत आहे.   
दरम्यान, मरतड देव संस्थानच्या इतर विश्वस्तांतीलही वादाची प्रकरणो बाहेर येऊ लागली आहेत. विश्वस्त अॅड. दशरथ घोरपडे यांनी विश्वस्त सुधीर गोडसे यांनी ही दमबाजी व शिवीगाळ केल्याची तक्रार जेजुरी पोलीस ठाणो व धर्मादाय आयुक्त कार्यालयाकडे केली होती. त्याच बरोबर देव संस्थानचे व्यवस्थापक दत्तात्नय दिवेकर यांनी ही विश्वास्ताविरुद्ध तक्रार दिलेली आहे. तक्रारींची चौकशी करून अहवाल धर्मादाय आयक्तांकडे पाठवण्याबाबत आयुक्त कार्यालयाने ही जेजुरी पोलीस ठाण्याला पत्न पाठवलेले आहे. 
 
4फि र्यादीनुसार  1 फेब्रुवारी ते 14 फेब्रुवारी 2क्14 दरम्यान देव संस्थानच्या लेखापरीक्षण अहवालात महाप्रसाद देणगीची चार पावती पुस्तके आढळून आली नसल्याची लेखापरीक्षकाने नोंद केली होती. यात दहा हजार, पाच हजार रुपये, एक हजार रुपये, आणि पाचशे रुपये देणगीची प्रत्येकी 1क्क् पावत्यांचे एक पुस्तक अशी एकूण सुमारे 16 लाख 5क् हजार रुपये रकमेची चार पावती पुस्तके आढळून आली नव्हती. 
 
4ही पावती पुस्तके कोठे गेली, याचा शोध घेतला असता विश्वस्त नंदा राऊत यांनी परस्परच देवसंस्थानला देणग्या गोळा करण्यासाठी नेल्याचे विश्वस्त संदीप घोणो यांच्या निदर्शनास आले. ही बाब अत्यंत बेकायदेशीर व चोरीचाच प्रकार असल्याचे निदर्शनास आणून देत विश्वस्त मंडळाने चौकशी करून योग्य ती कारवाई करण्याची मागणी मंडळाच्या मासिक बैठकीत केली होती. याच बैठकीत त्यांनी विना ठरावाद्वारे देवसंस्थानने सुमारे 1क् लाख रुपये खर्चाची दीपमाला, पायरीमार्ग, वेशी आदींच्या दुरुस्तीची विकासकामे पूर्ण करून त्याचे धनादेश ही परस्परच कसे दिले, असा जाब विचारला होता. 
 
4बैठकीत मोठा गदारोळ झाल्याने, घोणो यांनी शासकीय पदसिद्ध विश्वस्त तहसीलदार संजय पाटील यांच्याकडे ही तक्रार केली होती. या प्रकाराची रीतसर चौकशी व्हावी, व दोषींवर कायदेशीर कारवाई व्हावी, अशी मागणी घोणो यांनी लावून धरली होती. यानंतर चौकशी होऊ नये, म्हणून पावती पुस्तके स्वत:कडे ठेवणा:या विश्वस्त सौ. राऊत यांनी गेल्या 12 नोव्हेंबर रोजी पाच हजार रुपये रकमेची एक पावती, एक हजार रुपयांच्या 1क्क् पावत्या, व 5क्क् रुपयांच्या 28 पावत्या वितरित झाल्या असून, त्याची रक्कम रुपये एक लाख 19 हजार रोख तसेच उरलेली पावती पुस्तके देवसंस्थान कार्यालयातील संगणक ऑपरेटर धनंजय केळकर यांच्याकडे जमा करून त्यांनी पोहोच घेतली आहे. विश्वासतांनी परस्पर पावती पुस्तके नेली असून, ती केव्हा नेली हे मात्र केळकर यांनाही माहिती नसल्याचे त्यांनी लेखी दिले आहे. देव संस्थानचे व्यवस्थापक दत्तात्रय दिवेकर यांनाही ही पुस्तके केव्हा व कोणो नेली, याची माहिती नसल्याचे बैठकीतच निदर्शनास आले होते.

 

Web Title: Jejuri Devasthan's development work is also controversial

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.