ट्रकवर जीप आदळल्याने दोघे जागीच ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2016 18:31 IST2016-07-15T18:31:05+5:302016-07-15T18:31:05+5:30
- सोलापूर-मंगळवेढा मार्गावरील दामाजी साखर कारखाना पाटीजवळ रस्त्याच्या बाजूला उभारलेल्या ट्रकवर जीप आदळली़

ट्रकवर जीप आदळल्याने दोघे जागीच ठार
ऑनलाइन लोकमत
मंगळवेढा, दि. 15 - सोलापूर-मंगळवेढा मार्गावरील दामाजी साखर कारखाना पाटीजवळ रस्त्याच्या बाजूला उभारलेल्या ट्रकवर जीप आदळली़ या अपघातात जीपमधील दोघे जागीच ठार झाले तर नऊ जण जखमी झाले आहेत़ ही घटना १५ जुलै रोजी घडली़
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, लग्नकार्य झाल्यानंतर देवदर्शनासाठी कोल्हापूर येथे नितळी (जि़ उस्मानाबाद) येथील भोसले व जाधव कुटुंब जीप (क्ऱ एम़ एच़ १३ ए़ झेड़ २५७२) ने निघाले होते़ त्यांची गाडी मंगळवेढा तालुक्यातील दामाजी कारखाना पाटीजवळ आली असता तेथे पंक्चर काढण्यासाठी उभारलेल्या ट्रक (क्ऱ सी़ जी़ ०४ ए़ सी़ ८३८२) वर जोरदार आदळली़ या अपघातात देवकन्या संतोष पडवळ (वय ३५) व साहिल हणमंत भोसले (वय ११) हे दोघे जागीच ठार झाले तर प्रशांत साहेबराव जाधव (वय २५), साहेबराव रामराव जाधव (वय ६०), बापूसाहेब भोसले (वय ३५), समाधान भोसले (वय ३०), शशिकांत साहेबराव जाधव (वय २३), आशा भोसले (वय २३) सर्व रा़ नितकी, जि़ उस्मानाबाद तसेच संतोष शिवाजी पडवळ (वय ४०), सुदर्शन संतोष पडवळ (वय १४), साक्षी संतोष पडवळ (वय १२) सर्व रा़ उस्मानाबाद हे गंभीर जखमी झाले आहेत़ या सर्व जखमींना हवालदार आबासाहेब डोंगरे यांनी गाडीमधून बाहेर काढून सोलापूर येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे़ अपघात इतका भीषण होता की जीपचा पुढील भाग चक्काचूर झाला़ या घटनेची माहिती चालक सच्चिदानंद श्याम शिंदे (रा़ अरणी, जि़ उस्मानाबाद) यांनी मंगळवेढा पोलिसांना दिली़ अधिक तपास सपोनि अभिषेक डाके करीत आहेत़ (वार्ताहर)